टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांने राजेवाडीचे‌‌ पाणी येणार….प्रशासन लागले कामाला

On: April 1, 2025 11:38 AM
Follow Us:

सांगोला –

पंढरपुर दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस आले आसता लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी राजेवाडी तलावात‌ पाणी सोडण्याची मागणी केली होती, त्या वेळेस मुख्यमंत्री यांनी आमदार‌ बाबासाहेबांना तीन चार‌ दिवसात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री मा.जयकुमार गोरे व आमदार‌ गोपीचंद पडळकर  यांच्या समक्ष शब्द दिलेला होता.

सोमवार दि.३१ मार्च २०२५ रोजी कटफळ येथे कॅनाॅल साफ करण्याचे व वेगवेगळ्या तोट्या बंद करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आसुन आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मा.मुख्यमंत्र्यांना केलेली मागणी पुर्णत्वास येत असुन ..आमदार बाबासाहेब‌ देशमुख यांनी शनीवारी आमावस्ये दिवशी कटफळ येथील संत बाळु मामांच्या पवित्र मंदिरात उभे राहुन सांगीतले होते की, राजेवाडीचे पाणी येणारच आहे तसा मला मुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे. आणि तो दिलेला शब्द आज खरा होताना दिसत आहे.

पाणी येण्याच्या पुर्व‌ प्रक्रियेला प्रशासना कडुन सुरुवात झालेली असुन कटफळ भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाणी येण्याचा आनंद दिसत असून, शेतकरी वर्ग आमदार बाबासाहेब देशमुख यांचे कौतुक करताना दिसत असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा