चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार आता अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचला आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. कोण विजेता ठरणार हे काही तासातच स्पष्ट होईल. पण दुसरीकडे, गोल्डन बॉलसाठी चार गोलंदाजांमध्ये चुरस आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत..
चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 9 मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे. असं असताना गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉल कोणाला मिळेल याची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात गोल्डन बॉलच्या शर्यतीत असलेले चार टॉप गोलंदाज (Photo- TV9 Telugu)

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री पहिल्या स्थानावर आहे. हेन्रीने आतापर्यंत 10 विकेट्स घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात अधिक विकेट्स घेऊन गोल्डन बॉल जिंकण्याचा मानस असेल. पण अंतिम सामन्यात खेळेल की नाही याबाबत शंका आहे. कारण त्याला दुखापत झाली असून खेळण्याबाबत साशंकता आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हेन्रीने एकदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. (Photo- TV9 Telugu)

मोहम्मद शमीही गोल्डन बॉल जिंकण्याच्या शर्यतीत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. हेन्रीला मागे टाकण्यासाठी आणखी 3 विकेट्स घ्यायच्या आहेत. शमीने तीनपेक्षा जास्त विकेट्स घेतल्यास तो अव्वल स्थानावर असेल. शमीने बांगलादेशविरुद्ध पाच आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या आहेत. (Photo- PTI)

तिसऱ्या स्थानावर टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आहे. वरुणने आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत. परंतु त्याने 7 विकेट्स घेत या शर्यतीत उतरला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 5 विकेट्स आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन विकेट्सही घेतल्या आहेत. (Photo- PTI)

चौथ्या स्थानावर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर आहे. त्याने आतापर्यंत 7 विकेट्स घेतल्या आहेत. गोल्डन बॉल जिंकण्यासाठी सँटनरला शमी आणि हेन्रीला मागे टाकण्यासाठी पाचपेक्षा जास्त विकेट्स घ्याव्या लागतील. (Photo- Getty Images)