टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता खात्यात कधी जमा होणार?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार? याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2025) मुहुर्तावर मिळणार आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार? याकडे आता लक्ष लागले आहे. मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली होती.

महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जुलै 2024 पासून लागू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीनं आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या, त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने निकष ही लावले आहे. या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे.

याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले होते की, ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे, त्यामुळे 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेंतर्गत विचार केला जात नाही. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता 

आता एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार आहे.  महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती. यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Children’s Health : मुलांचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? मग दुधासोबत या पदार्थांचा करा समावेश!

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं; अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच आज हादरवणारं घडलं

सर्वात मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर चर्चा; भेटीचे कारण काय?

Sangli News : तुफान वारा सुटला अन् देवीचं दर्शन ठरलं अखेरचं, 6 भाविकांचा भिंतीखाली दबून मृत्यू; महाराष्ट्र हळहळला!

Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु

देशभर ताफा घेऊन मिरवणुका काढता, स्वत:वर फुलं उधळून घेता, त्याचं काय करणार आहात?; राज ठाकरेंचा पंतप्रधानांना पत्रातून सवाल

Sunetra Pawar On NCP National Executive List: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल, तटकरेंची नावं गायब, पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांकडून स्पष्टीकरण