टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

राष्ट्रवादीत चाललंय काय? मोठ्या घडामोडींना वेग, पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर आनंद परांजपे थेट सिल्व्हर ओकवर

On: May 17, 2026 10:40 AM
Follow Us:

Parth Pawar Meets Devendra Fadnavis: राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादीतील धुसफुसीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर दुसरीकडे शिंदे सेनेत प्रवेश केलेले आनंद परांजपे यांनी सिल्व्हर ओक गाठले आहे.

राष्ट्रवादीत चाललंय काय? मोठ्या घडामोडींना वेग, पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर आनंद परांजपे थेट सिल्व्हर ओकवर

Anand Paranjape Meets Sharad Pawar: गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रवादी ही राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते नाराज असल्याचे वृत्त समोर आले. तर पक्षातीलच नेत्यांनी हे वृत्त धांदांत खोटे असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगतिले. तरीही पाणी कुठे तरी मुरतंय असे एकंदरीत प्रतिक्रियेतूनही समोर येत आहे. या घडामोडी कमी की काय, काल खासदार पार्थ पवार, वर्षा निवासस्थानी दाखल झाले. तर आज शिंदे सेनेत प्रवेश केलेले आनंद परांजपे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहचले. राष्ट्रवादीतील घडामोडींमुळे या भेटीला महत्त्व आले आहे.

भेटीमागील कारण गुलदस्यात

खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे. पार्थ पवार हे एकटेच भेटायला गेले अशीही माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीतील धुसफूस वाढल्यानंतर पवार आणि फडणवीस यांच्यातील या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीतील बडे नेते खरंच नाराज आहेत का? येत्या काही दिवसात काही नेते वेगळी चूल मांडणार का? कुणाला पक्षातून डावललं जात आहे याची चर्चा रंगली आहे. तर आता भाजप या सर्व परिस्थितीत कोणती भूमिका घेते याकडेही लक्ष लागले आहे.

आनंद परांजपे सिल्व्हर ओकवर

शिवसेना नेते आनंद परांजपे हे शरद पवार यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक वर दाखल झाले. आनंद परांजपे हे मुळचे शिवसैनिक, पण त्यांनी नंतर राष्ट्रवादीची घड्याळ हातावर बांधली. गेल्या 14 वर्षांपासून ते राष्ट्रवादीत होते. दोन शक्कलं झाल्यानंतर त्यांनी अजितदादांची साथ धरली. पण गेल्या काही दिवसांपासून परांजपे हे नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यांनी याविषयीचे उघड संकेतही दिले. तर त्यानंतर आता त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. राजकीय घड्याळ बिघडू नये यासाठी त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. तर शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी ते सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले जात असले तरी अजितदादांच्या अकाली निधनानंतर परांजपे अचानक पक्ष का सोडून गेले, याचीही चर्चा होत आहे.

हे सुद्धा वाचा

IPL 2026 Playoff: चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफचं गणित आरसीबीच्या हाती, कसं काय ते समजून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now