टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

10 मिनिटांआधी अजितदादा नेमकं काय म्हणाले होते?, कार्यकर्त्याने कॉल रेकॉर्डिंग ऐकवली!

Follow Us:

Ajit Pawar Last Call Recording Before Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अजितदादांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवली.

Ajit Pawar Last Call Recording Before Plane Crash: अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी 8.46 वाजता विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. (Ajit Pawar Death) लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज अजित पवारांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अजितदादांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवली.

अखेरच्या कॉलमध्ये श्रीजीत पवारांसोबत अजित पवारांचं संभाषण झालं होतं. श्रीजीत पवारांनी केलेल्या मेसेजला अजित पवारांनी कॉल करुन उत्तर दिलं. विमानाचं बारामतीमध्ये लँडिंगआधी अजित पवारांनी नेटवर्क आल्यानंतर श्रीजीत पवारांना कॉल केला होता.अजित पवारांच्या विमानाचा अपघात सकाळी 8.46 वाजता झाला होता. त्याआधी 8 वाजून 37 मिनिटाला अजित पवारांनी श्रीजीत पवार पवारांना कॉल केला होता. या कॉलमध्ये सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाण्याची अजित पवारांची भूमिका होती आणि याबाबतच अजित पवार श्रीजीत पवारांसोबत फोनवर बोलत होते. (Ajit Pawar Last Call Recording Before Plane Crash)

श्रीजीत पवार नेमकं काय काय म्हणाले?

जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी बाबत श्रीजीत पवार आणि अजित पवारांचं शेवटचं बोलणं झालेलं. यामध्ये सर्व जाती धर्म सोबत आपण राहत आहोत सगळ्यांना न्याय देण्याचा पण काम करू , असं अजित पवार श्रीजीत पवारांना म्हणाले. तसेच माळी समाजाला मी जिल्हा परिषद उमेदवारी दिली आहे. बाकीचे कोणी दिली नाही, इतर पक्षांनी कोणी दिले नाही आपण ती दिलेली आहे, असं अजित पवार फोनवर बोलत आहेत.

अजित पवारांच्या विमानाता सकाळी 8.46 वाजता अपघात-

अजित पवार यांचा लास्ट कॉल 8 वाजून 37 मिनिटांनी आहे. एका विषयावर मी अजित पवार यांच्याशी बोलणार होतो. 8.19 मिनिटांनी मी अजित पवार यांना मेसेज केला. रेंजमध्ये मेसेज मिळताच मला अजित पवार यांनी मला फोन केला. 8.37 वाजेपर्यंत अजित पवार बोलत होते. विमानात असताना अजित पवार यांनी फोन केला होता, असं श्रीजीत पवार म्हणाले. दरम्यान, अजित पवारांच्या विमानाचा अपघात साधारण 8.46 वाजता झाला होता.

काय होता तो शेवटचा संवाद?

श्रीजीत पवार यांच्याशी अजित पवारांनी सुमारे एक मिनिटाचा संवाद साधला जात आहे. या संभाषणात अजित पवारांच्या आवाजात तीच कामाची ओढ आणि सर्वसमावेशकतेची भावना दिसून आली. श्रीजीत यांनी सांगितले की मी इतका महत्त्वाचा नव्हतो की दादांनी लँडिंगच्या वेळी मला फोन करावा, पण प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याचा त्यांचा स्वभाव होता.

अजित पवार आणि श्रीजीत पवार यांचा संवाद

अजित पवार: अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे हे माळी समाजाचे नेतृत्व आहेत. त्यांना अनेक वर्षांनंतर संपूर्ण जिल्ह्याच्या बँकेचा चेअरमन मी स्वतः केलं आहे. तुम्हाला अनेकदा वस्तुस्थिती माहिती नसते आणि तुम्ही काहीही बोलता. आम्ही राजकारण करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातो, हे लक्षात घे.

श्रीजीत पवार: दादा, मला जे वाटलं ते मी बोललो.

अजित पवार: तुझं म्हणणं मान्य आहे, पण वस्तुस्थिती समजून घे. आताही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुपे गटातून मी माळी समाजाला उमेदवारी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने असा निर्णय घेतलेला नाही, पण आपण समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. अशा पद्धतीने आम्ही सर्वांना न्याय देण्याचं काम करतोय.

श्रीजीत पवार: ठीक आहे दादा, तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो तो अंतिम निर्णय आहे, मी फोन ठेवतो. धन्यवाद!

यानंतर अजित पवार आणि श्रीजीत पवार यांच्याशी असलेला संवाद संपला. त्यानंतर काहीच वेळात नियतीने घात केला.

संपूर्ण राज्यात शोककळा

अजित दादांच्या निधनानंतर बारामती आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा, ही सर्वांची इच्छा होती म्हणून आम्ही ही क्लिप ऐकवली, असे श्रीजीत यांनी सांगितले. अजित पवारांचा कामाचा व्याप आणि शेवटच्या श्वासापर्यंत सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची जिद्द ही शेवटच्या संवादातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य