टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Fight over Kittens : तुमच्या बोक्यामुळे आमची माऊ गरोदर, सांभाळा आता चार पिल्लं; मालकिणीने मांजरं भिरकावली, शेजाऱ्यांमध्ये वाद पेटला

On: April 15, 2026 12:19 PM
Follow Us:

Bengaluru neighbours clash over newborn kittens : पिल्लांची जबाबदारी मांजरीच्या मालकाची आहे की बोक्याच्या मालकाची, यावरुन शेजाऱ्यांमध्ये जोरदार वाद पेटला.

बंगळुरु : मांजर आणि बोक्याची हलकीफुलकी प्रेम कहाणी त्यांच्या मालकांमध्ये महाभारत पेटवून गेली. कर्नाटक राज्यातील बंगळुरुतील शेषाद्रीपुरम भागात राहणाऱ्या दोघा शेजाऱ्यांच्या मांजर आणि बोक्याचं लफडं होऊन चार पिल्लांचा जन्म झाला. मात्र त्यांच्या ‘मालकी’वरुन दोन कुटुंबांमध्ये संघर्ष पेटल्याने अखेर पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही परिस्थिती अत्यंत नाजूक झाली होती. होयसाला पोलीस पथकाला ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.

मांजरीला चार पिल्लं

बंगळुरुतील शेषाद्रीपुरम भागात शेजारच्या घरातील बोक्याशी ठेवलेल्या संबंधातून एका घरातील मांजर गरोदर झाली. यातून चार पिल्लांचा जन्म झाल्यामुळे हा विचित्र वाद उफाळून आला. ही गोंडस पिल्लंच दोन्ही कुटुंबांमधील वादाचं केंद्रबिंदू ठरली.

पिल्लाच्या मालकीवरुन वाद

पिल्लं आपल्या आईच्या मागोमाग मांजरीची मालकी असलेल्या कुटुंबाच्या घरात शिरली. एकतर मांजरीने चार पिल्लांना जन्म दिल्यामुळे ते कुटुंब आधीच नाराज झालं होतं. या पिल्लांची जबाबदारी मांजरीच्या मालकाची आहे की बोक्याच्या मालकाची, यावरुन त्यांच्यात जोरदार वाद पेटला.

मांजरीची मालकीण आणि तिच्या मुलीने रविवारी पहाटेच्या सुमारास त्या मांजरीची पिल्लं शेजारच्या बोक्याच्या मालकाच्या घरासमोर फेकून दिली. या घटनेमुळे बोक्याच्या मालकाच्या घरात संतापाची लाट उसळली आणि वाद मर्यादेबाहेर गेला.

सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात! बारामती पोटनिवडणुकीसाठी कुटुंब एकवटलं

बोक्याच्या मालकाला धमकी

दोघांमध्ये शा‍ब्दिक खटके उडाले. मांजरीच्या मालकिणीने बोक्याच्या मालकाच्या मुलांवर ॲसिड हल्ला करण्याची धमकी दिली, त्यामुळे त्या मालकाला पोलीस हेल्पलाइनवर संपर्क साधावा लागला. दोन्ही कुटुंबं वादात रंगली असतानाच, ती मांजरीची पिल्लं तिथून भरकटून दूर निघून गेली. त्यानंतर ती व्याकुळ झालेली मांजर आपल्या हरवलेल्या पिल्लांचा शोध घेताना दिसून आली.

पोलिसांची मध्यस्थी

शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्यातील होयसाला पथकाने सकाळी ७ वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचून तणाव कमी केला. तसेच दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी दोन मांजरीच्या पिल्लांची काळजी घेण्याचा सल्ला दिला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, बोक्याच्या मालकाचं कुटुंब ॲसिड हल्ल्याच्या धमकीबाबत तक्रार दाखल करण्याच्या विचारात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now