स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले, वाटेत चालकाची एक चूक अन् भंयकर घटना; 5 जागीच ठार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून पनवेलहून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी निघालेल्या सहा भाविकांपैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. एका महिला प्रवाशाचा जीव वाचला असून, सध्या तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

सोलापूर : पनवेलहून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या सहा भाविकांपैकी पाच जणांचा पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवडी पाटीजवळ हा अपघात घडला. वाहनचालकाचें नियंत्रण सुटल्यामुळे इर्टिका कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर देवडी पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. पनवेलहून अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी निघालेली एरटीका कार (MH-46 Z 4536) या वाहनाचा चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. हा अपघात शनिवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडला असून या अपघातात कारमधील पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

कारमध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र होते. या सहा प्रवाशांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. दुर्दैवाने, या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एक महिला प्रवासी मात्र या अपघातातून बचावली आहे. अपघातातून वाचलेल्या जखमी महिलेचे नाव ज्योती जयदास टाकले आहे. त्या सेक्टर ७, पनवेल, जि. रायगड येथील रहिवासी आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की कार रस्त्यापासून अंदाजे १० ते १५ फूट अंतरावर झुडपांमध्ये अडकली होती. अपघातानंतर मृतदेह पूर्णपणे वाहनामध्ये अडकले होते. मृत आणि जखमी व्यक्तींची नावे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि आवश्यक त्या उपाययोजना केल्या. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शेडगे करत आहेत.

 

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon