टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Rain Alert : आला आला वारा, संगे पावसाच्या धारा, आज आणि उद्या वादळी पाऊस, हवामान खात्याचा काय इशारा

Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यात पूर्व मौसमी वारे सुद्धा सक्रिय झाल्याने मे महिन्यातील उन्हाळा पावसाळ्यात बदलल्याचे दिसून येत आहे. यावेळी मान्सून लवकर धडकण्याची शक्यता आहे.

राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यात पूर्व मौसमी वारे सुद्धा सक्रिय झाल्याने मे महिन्यातील उन्हाळा पावसाळ्यात बदलल्याचे दिसून येत आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूर्व मौसमी वाऱ्यांची सक्रियता दिसत आहे. त्यामुळे मान्सून येण्यापूर्वीच पूर्व मौसमी पावसाची थाप राज्याच्या दारावर पडण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सून लवकर धडकण्याची शक्यता आहे.

ढगांचा गडगडाट

मुंबईमध्ये १६ आणि १७ मे रोजी वादळी वारा आणि ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट दिसून येईल. धुवांधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यातच राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.

सरासरीपेक्षा जास्त पाऊस

मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार राज्यासह देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार आहे. दुसरीकडे ३१ मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात गडगडाटी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. १५ ते २२ मे दरम्यान महाराष्ट्र, ओडिशासह दक्षिण व ईशान्य भारतातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. २२ ते २९ मेदरम्यान राज्यासह पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण व पूर्व भारतात पाऊस सरासरी ओलांडेल

२९ मे ते ५ जूनदरम्यान कर्नाटक, बंगालच्या खाडी किनारी आणि ५ ते १२ जूनदरम्यान महाराष्ट्र व कर्नाटकात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. अरबी समुद्रावर आणि तेलंगणा राज्यावर केंद्र असलेल्या दोन चक्रीय वाऱ्यांच्या संयोगातून सध्या वळवाच्या पावसाची शक्यता आहे. त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत या पावसाचा प्रभाव अधिक असेल. या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग

Rohit Pawar: कर्जमाफीवर भरवसा नाय… रोहित पवार पुन्हा मैदानात… या दिवसापासून राज्यात एल्गार मोर्चा

Kailas Patil : Kailas Patil : जिगरी मित्र दुसऱ्या पक्षात; शेवटच्या भेटीत काय बोलणं झालं? ओमराजेंविरुद्ध लढणार? शिंदेंकडून बोलवणं आलं का? कैलास पाटील स्पष्टच बोलले

Maharashtra Rain Weather Update:पुढील 48 तासांत राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; पुण्यासह राज्यात 27 जुलैपर्यंत महत्वाचे इशारे  

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या बंडखोरीवर शरद पवार बोलले स्पष्ट, थेट..

मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर