टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

थांब, तुझी एन्क्वायरीच लावतो, भरसभेत आमदार तानाजी सावंत यांचा बंडखोर उमेदवाराला दम

Follow Us:

Tanaji Sawant Warned Candidate: महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे, माझा नाद करायचा नाही असे म्हणत तानाजी सावंत विरोधी उमेदवारावर बरसले. त्यांनी बंडखोर उमेदवाराला चांगलंच दमात घेतलं. त्याला सज्जड दम ही भरला. सावंत यांचं हे भाषण व्हायरल होत आहे.

Tanaji Sawant: थांब, तुझी एन्क्वायरीच लावतो, भरसभेत आमदार तानाजी सावंत यांचा बंडखोर उमेदवाराला दम

 

“थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो,” अशा शब्दांत राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला जोरदार दम भरला. धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवारावर थेट टीका केली. सभा स्थळी येताना रस्त्यांच्या दुरवस्थेवरून संताप व्यक्त करत, जनतेला वेठीस धरू नका असा इशारा त्यांनी दिला. आपलाच जुना कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने तानाजी सावंत (Tanaji Sawant Warned Candidate) आक्रमक झाले. “महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे, माझा नाद करायचा नाही,” असे म्हणत त्यांनी बंडखोर उमेदवारावर निशाणा साधला.

तुझ्या बापानं निधी आणला का?

धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात ही सभा झाली. त्यावेळी त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेवरून विरोधकांना खडसावले. आज रस्त्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. मी रस्त्यावरून आलो. तो रस्ता विरोधक आपणच केल्याचा दावा करत आहेत. तुझ्या बापानं निधी आणला का? महाराष्ट्र सरकारचा पैसा आहे, निधी मी आणला. थांब आता तुझी चौकशीच लावतो. माझा नाद करायचा नाही. मी मी म्हणणाऱ्यांची मी जिरवली आहे, असा सज्जड दम आमदार तानाजी सावंत यांनी भरला. जुन्या कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवत असल्याने तानाजी सावंत आक्रमक झाल्याचे दिसले.

ओमराजे निंबाळकरांवर मोठी टीका

भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना निवडून आणण्याचे ओमराजे निंबाळकर यांचे प्लॅनिंग आहे का अशी लोकात कुजबुज असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी केलाय. तेर जिल्हा परिषद गटाच्या लढतीवरून सक्षणा सलगर यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. तेर मध्ये महाविकास आघाडी व्हावी ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती मग ओमराजे निंबाळकर यांनी त्याला केराची टोपली का दाखवली ? , त्यांना नेमकं कोणाला निवडून आणायचे विरोध फक्त दाखवण्यासाठी आहे का? असा सवाल करत त्यांनी निशाणा साधला. तर जिल्हा परिषद निवडणूक न लढण्याची घोषणा करून अर्चना पाटील पुन्हा मैदानात का ? राणा जगजितसिंह पाटील आणि अर्चना पाटलांनी पक्ष खुंटीला बांधला अशी टीका सलगर यांनी केली. धाराशिव जिल्ह्यातील तेर जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज लढत होतेय . ठाकरे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असा तिरंगी सामना आहे. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील भाजपकडून तेर जिल्हा परिषद गटातून निवडणूक आखाड्यात आहेत. तर राष्ट्रवादीकडून सक्षणा सलगर उमेदवार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही स्वतंत्र उमेदवार रिंगणात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य