टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Virat Kohli : विराटचा कसोटी क्रिकेटला अलविदा, निवृत्तीचा निर्णय जाहीर

14 वर्षांच्या कारकिर्दीनंतर विराट कोहलीने अखेर कसोटी क्रिकेटला अलविदा केलं आहे. रोहित शर्मापाठोपाठ आता विराटनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहीत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

 

भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटून विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यातच विराटने निवृत्तीचे संकेत दिले होते, BCCIशी त्याचं बोलणंही झालं होतं. मात्र अखेर आज या निर्णयावर त्याने शिक्कामोर्तब करत हा निर्णय जाहीर केला आहे. रोहित शर्मापाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र ही अतिशय वाईट बातमी असून लाखो चाहत्यांचे हृदयभंग झालाय हे निश्चितच !

14 वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या कारकिर्दीला अखेर जड अंत:करणाने अलविदा करत असल्याचे सांगत विराटने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now