टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ujani Dam : चिंता मिटली! उजनी धरणाने गाठली जिवंत साठ्याची पातळी; 14 दिवसात आले 12 टीएमसी पाणी

Ujani Dam : उजनी धारणाच्या इतिहासात यंदा प्रथमच धरण मे महिन्यातच जिवंत साठ्यात आले असून गेल्या चौदा दिवसात तब्बल 12 टीएमसी पाणी धरणात जमा झाले आहे.

Ujani Dam : उजनी धारणाच्या इतिहासात यंदा प्रथमच धरण मे महिन्यातच जिवंत साठ्यात आले असून गेल्या चौदा दिवसात तब्बल 12 टीएमसी पाणी धरणात जमा झाले आहे. गेल्या वर्षीही धरण एकशे दहा टक्के भरल्यानंतर जिवंत साठा संपून वजा 23 टक्केपर्यंत धरणाची पातळी खालावली होती. मात्र मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने यंदा प्रथमच मे महिन्यात उजनी धरणाने मृत साठ्याची पातळी ओलांडत आज (27 मे ) सकाळी आठ वाजता जिवंत साठ्यात प्रवेश केला आहे. अजूनही उजनी धरणात 26 हजार क्युसेक विसर्गने पाणी जमा होत असल्याने असाच पाऊस सुरू राहिला तर पुढच्या काही दिवसात पुराचे संकट उभे राहणार आहे.

जुलैच्या पूर्वीच सोलापूर जिल्ह्यावर पूर परिस्थितीची टांगती तलवार?

दरम्यान, उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या तुफान पावसामुळे केवळ 14 दिवसात उजनीने वजा 23 टक्क्यापासून शून्य पातळी ओलांडत जिवंत साठ्यात प्रवेश केलाय. यंदा 13 मे पासून उजनी धरणात हळूहळू पाणी जमा होण्यास सुरुवात झाली होती. मात्र गेल्या आठ दिवसात तब्बल 12 टीएमसी पाणी धरणात जमा झाले आहे. आज सकाळी आठ वाजता उजनी धरणाने जिवंत साठ्यात केला प्रवेश आहे.  विशेष म्हणजे गेल्या वर्षी या दिवशी उजनी धरण हे वजा 59% एवढ्या नीचांकी पातळीला होते.  मात्र यावर्षी याच दिवशी धरणात मृत साठा भरून जिवंत साठ्यात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अजून मान्सून या भागात पोहोचायचा असून असाच पाऊस सुरू राहिला तर यंदा जुलैच्या पूर्वीच सोलापूर  (Solapur) जिल्ह्यावर पूर परिस्थितीची टांगती तलवार असू शकते, असेही जाणकारांचे मत आहे.

 

उजनीत वाढलं 12 टीएमसी पाणी

उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. या धरणाची पाणी क्षमता ही 117 टीएमसी आहे. मागील वर्षी देखील चांगला पाऊस झाला होता. त्यामुळं धरण पूर्ण क्षमतेनं भरलं होतं. या धरण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर बागायती शेती अवलंबून आहे. विशेषत ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर केळी, डाळिंब, द्राक्षांच्या बागांचं क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं उजनी धरणात होणारी पाण्याची वाढ ही शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरत आहे.

पुणे, सोलापूर आणि नगरकरांसाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण आता मायनस मधून प्लस मध्ये आलं आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटामध्यावर आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडा भरापासून पाऊस कोसळतोय. सध्या दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात 26 हजार 106 क्युसेकने पाणी येतंय त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.उजनी धरणी एकूण पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी इतकी असून जेव्हा धरण 117 टीएमसी इतकं भरलं जातं तेव्हा ते 100 टक्के क्षमतेने भरतं. आता उजनीत 63 टीएमसी हून अधिक पाणी साठा आहे. जर पावसाचा वेग असाच राहिल्यास अगदी मोजक्या दिवसात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2025: ‘ऑपरेशन सिंदूर’चं यश बीसीसीआयही साजरं करणार; आयपीएलच्या अंतिम सामन्यात विशेष कार्यक्रम

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

बेसावध इराणचा मोठा घात झाला, डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटी डाव साधलाच, अमेरिकेचं स्पेशल ऑपरेशन, मध्यपूर्वेतून सर्वात मोठी बातमी

India-China : श्रीलंकेच्या भूमीवर भारताचा मास्टरस्ट्रोक, ड्रॅगनला जशास तसं उत्तर, UAE च्या मदतीने चीनचा मोठा खेळ बिघडवला

Jay Pawar: जयड्या रडायचं नाही लढायचं; जय पवारांचं भावूक भाषण, अजित दादांची आठवण, बारामतीकरांना ‘लव्ह यु टू’

Mahesh Shinde On Eknath Shinde: शिवसेनेच्या आमदाराने एकनाथ शिंदेंच्या विरोधातच दंड थोपटलं; म्हणाले, जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?

Horoscope Today 20th April 2026 : खास व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी, लग्नाचा प्रस्ताव… वाचा आज तुमच्या राशीत काय ?

Oil Price Surge : आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा भूकंप, जगात हाहाकार, युद्धात मोठा फटका, थेट तेलाच्या..