टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Uddhav Thackeray: ‘खड्डामंत्री’, उद्धव ठाकरेंची सभेत तुफान टोलेबाजी… NEET नंतर आता या विषयावर आंदोलन पेटणार, सरकारला थेट इशारा

Uddhav Thackeray on Nitin Gadkari: मुंबईत आयोजित तिरंगा रॅलीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. तर नितीन गडकरी यांचा उल्लेख त्यांनी खड्डामंत्री असा करताच गर्दीतून हश्या आणि टाळ्या वाजल्या. तर पुढील आंदोलन कोणत्या विषयावर होणार हे पण ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray: 'खड्डामंत्री', उद्धव ठाकरेंची सभेत तुफान टोलेबाजी... NEET नंतर आता या विषयावर आंदोलन पेटणार, सरकारला थेट इशारा

Uddhav Thackeray on Nitin Gadkari: कॉक्रोच जतना पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. आज मुंबईत ठाकरे बंधुंनी अगोदरच तिरंगा मोर्चा आयोजित केला होता. आजच्या मोर्चाला जोरदार प्रतिसाद दिसला. तरुणाईच नाहीतर अबालवृद्धांनी या तिरंगा मार्चमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. मनसे आणि उद्धव सेनेने हा मार्च आयोजित केला होता. हा मार्च दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान, शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांवर हल्लाबोल केला. गडकरी यांचा उल्लेख त्यांनी खड्डामंत्री असा करताच सभेत एकच हश्या पिकला. यावेळी NEET पेपरफुटीनंतर आणि प्रधानांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या विषयावर आंदोलन होणार याचा स्पष्ट इशारा या सभेतून दिला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, दोन्ही पक्षातील नेते, आमदार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्यासह इतर अनेक नेते उपस्थित होते.

गडकरी यांचा उल्लेख खड्डामंत्री

केंद्रीय अर्थमंत्री महागाईवर बोलत नाही, पण पेपरफुटीचे फायदे काय आहेत, त्यावर बोलतात. राजनाथ संरक्षण मंत्री, देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानांच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डामंत्री, रस्तामंत्री ते इथेनॉलवरती बोलत आहेत. हा या पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉलवरती बोलत आहेत ते. मोदींना मला सांगायचं आहे की, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून जितका यातना झाल्या, त्यापेक्षाही अधिक यातना, नीट पेपरफुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी जीव दिला, त्यांच्या पालकांना झाला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

आता इथेनॉलवर आंदोलन

या सभेतून चौफेर फटकेबाजी करताना उद्धव ठाकरे यांनी यापुढील आंदोलन हे E20, इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर होईल याचा स्पष्ट इशारा दिला. विरोधकांच्या अजेंड्यावर इथेनॉल मिश्रित पेट्रोल आले आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे अनेक वाहनांचे मायलेज कमी झाले आहे. देखभाल खर्च वाढला आहे. इंजिनाच्या कार्यक्षमतेवर मोठा परिणाम झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी वाहनधारकांनी या पेट्रोलविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी इथेनॉलवर टीका केली आहे. आता हाच मुद्दा ऐरणीवर असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेतून दिले आहे.

4 ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा

दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनने 4 ऑगस्ट रोजी E20, इथेनॉल मिश्रित पेट्रोलविरोधात मोर्चाची हाक दिली आहे. येत्या मंगळवारी असोसिएशन संसदेवर मोर्चा काढणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. E20 मिश्रित पेट्रोलची अघोषित सक्ती हटवण्याची मागणी त्यांनी केली. वाहनधारकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हाच विषय अजेंड्यावर असल्याची घोषणा सभेतून केली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now