टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महिला मजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

काही महिला विहिरीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.

महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे ग्रहण लागले आहे. त्यात आता नांदेडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. यामुळे तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिसरातील आलेगावमध्ये सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजूर यांना हळद काढणीसाठी एक ट्रॅक्टर जात होतं. मात्र त्या ट्रॅक्टर चालकाला विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळला. या विहिरीत पाणी असल्याने अनेक महिला यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. या बचाव कार्यादरम्यान काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर परिसरात खळबळ

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. या बचाव कार्यादरम्यान काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

यातील दोन महिलांना पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र ट्रॅक्टर ट्रॉली आणि काही महिला या विहिरीतच आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व महिला हिंगोलीतील वसमत तालुक्यातील भुज गावात राहणाऱ्या आहेत.

कशी घडली घटना?

यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7 ते 7.30 या दरम्यान घडली. सध्या या भागात पाऊस सुरु आहे. यामुळे ट्रॅक्टरचे टायर स्लीप झाल्याने ही घटना घडली. यानंतर आम्ही लगेचच यातील काही महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोन महिलांना वाचवण्यात आम्हाला यश आलं. त्या महिला विहिरीतून बाहेर आल्यानंतर इतरांना बाहेर काढा, असे सांगत होत्या. पाऊस पडल्याने ट्रॅक्टर स्लीप झाला. यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर विहिरीत पडला.

1/6

हिंगोली जिल्ह्यामधील शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे.
हिंगोली जिल्ह्यामधील शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे.
2/6
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर या ट्रॅक्टरमध्ये होत्या.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर या ट्रॅक्टरमध्ये होत्या.
3/6
ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले आहे.
ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले आहे.
4/6
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन महिला सह एका पुरुषाला वाचवले आहे. मात्र अद्याप ही सात ते आठ जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून हिंगोली सह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

5/6
धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला असून ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे.
धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला असून ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे.
6/6
ट्रॅक्टरमध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
ट्रॅक्टरमध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार

महापालिकेची इमारत ‘भुतिया’, तिथे आत्मे वावरतात; महायुतीतील मंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ, संजय शिरसाट यांचा दावा तरी काय?

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान; निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम

Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा राडा, सत्काराच्या कार्यक्रमात दोन गट भिडले

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली

Loksabha : लोकसभेतील खासदार 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर