दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली: आता 6 ऐवजी 5 जुलै रोजी निघणार मोर्चा; मराठी माणसांसाठी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
-
दुचाकी-स्कूटर पूर्वीप्रमाणेच टोल फ्री राहतील: 15 जुलैपासून महामार्गांवर कर लादण्याची बातमी अफवा, गडकरी म्हणाले- असा कोणताही निर्णय नाही
-
बबनराव लोणीकरांना उपरती: मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर म्हणाले – अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरोधात बोलणार नाही
-
महापालिकेच्या निवडणुका एकोप्याने कशा लढल्या जातील यावर चर्चा: इतर पक्षांची आज गरज भासत नाही, खासदार सुनील तटकरे यांचे मत
-
हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक: 5 जुलैला राज ठाकरेंचा मोर्चा तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंचे धरणे आंदोलन; त्रिभाषा सूत्रही नाकारले
-
‘वॉर 2’ चे तीन पोस्टर्स प्रदर्शित: हृतिक, कियारा व ज्यु. NTR अॅक्शन अवतारात दिसले; 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
-
जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा
-
शहा म्हणाले- कोणत्याही परदेशी भाषेला विरोध नाही: हिंदी सर्व भारतीय भाषांची सखी; आधी म्हटले होते- देशातील इंग्रजी भाषिकांना लवकरच लाज वाटेल
-
इयत्ता पहिली नव्हे, तिसरीपासून हिंदी भाषेची पुस्तके; राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सांगितला शिक्षण धोरणातला मुद्दा
-
हिंदीविरोधी मोर्चाला कोण कोण येत नाही तेच बघतो, राज ठाकरेंचा कलाकारांसह राजकीय नेत्यांनाही निर्वाणीचा इशारा; मोर्चात ना कोणता झेंडा, फक्त मराठीचाच अजेंडा!
-
हिंदी सक्तीबाबत ठाकरे बंधूचं स्टेटमेंट चुकीचं नाही; शरद पवारांचं भाष्य, आधी त्यांच्याकडून विचारणा होऊ द्या, आमचा अॅप्रोच निगेटीव्ह नाही, मोर्चातील सहभागावर पवारांची भूमिका
-
मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा
-
देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली: आता आमचे काय होणार? मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याला शरद पवारांचा खोचक टोला
-
मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तिपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल
-
शेतकऱ्यांना कसाबपेक्षाही वाईट वागणूक, शक्तिपीठ महार्गावरुन शेट्टींचा हल्लाबोल, धाराशिवमध्ये मोजणी प्रक्रिया थांबवली
-
किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा धक्का, हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली; मंत्री महोदय ईडीतून सहीसलामत सुटले
-
पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, विधानसभेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापणार, 30 जून ते 18 जुलैपर्यंत अधिवेशन
-
आमच्या वहिनीला भाजपने फोडलं, पश्चाताप होणार; जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा एल्गार
-
अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं
-
दिवा विझल्यावर तेल टाकून फायदा नसतो; भास्कर जाधवांच्या स्टेटसमुळे ठाकरे गटात खळबळ, तर्कवितर्कांना उधाण
-
सोलापूरमधील हॉटेलमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुरड्यांनी जागेवरच जीव सोडला, आई-वडीलही गंभीर जखमी
-
राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली, मराठवाड्यात 65 महसूल मंडळात अतिवृष्टी; विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट, IMD चा अंदाज
-
आज सोने स्वस्त, चांदीत तेजी: सोने ₹127 ने घसरून ₹97030 तोळा, चांदी ₹1325 ने वाढून ₹1.06 प्रति किलोवर
-
दुसऱ्या कसोटीपूर्वी जोफ्रा आर्चर इंग्लंड संघात सामील: शेवटचा सामना 4 वर्षांपूर्वी खेळला होता, भारताविरुद्ध 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये सामना
-
सूर्यकुमारचे जर्मनीत स्पोर्टस हर्नियाचे ऑपरेशन: फोटो पोस्ट करत दिली माहिती; लिहिले- शस्त्रक्रियेनंतर बरा होत आहे
-
पाक क्रिकेटपटू अब्बासने इशानसोबतचा फोटो शेअर केला: दोघेही काउंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉटिंगहॅमशायरकडून खेळत आहेत; इशानने 87 धावा केल्या
-
मुंबईत वर्षातील सर्वात उंच भरती आज; दुपारी 12.55 वाजता 16 फूट उंच लाटा उसळल्या, वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, पुढील 5 दिवस पालिकेकडून अलर्ट