Two Helmet Rule Bike : दुचाकी वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. अनेक राज्यात हेल्मेटचा वापर अनिवार्य आहे. आता हेल्मटविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दुचाकी वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. दुचाकी वाहनासाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. दोन हेल्मटची सक्ती होणार आहे. लवकरच दुचाकी वाहन उत्पादकांना वाहन विक्री वेळी खरेदीदारांना दोन हेल्मेट देणे अनिवार्य करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि तरुणांनी हेल्मटे घालावे यासाठी जागरुकता आणण्यात येणार आहे. दोन हेल्मेट जर मिळणार असेल तर दुचाकीस्वार आणि त्याच्या मागील प्रवाशाला सुद्धा हेल्मेट घालणे सक्तीचे होणार हे नक्की आहे. याविषयीची अधिसूचना येऊन धडकली आहे. काय आहे परिवहन मंत्रालयाचा तो आदेश, जाणून घ्या…
काय आहे तो आदेश?
केंद्र सरकारने दुचाकी वाहन निर्मिता करणाऱ्या कंपन्यांसाठी नवीन अधिसूचना लागू केली आहे. दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट देने अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन नियमांसाठी केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले आहेत. अंतिम अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्यातच नवीन नियम अनिवार्य होतील. त्यानंतर रस्त्यावर दुचाकी चालक आणि दुचाकी स्वार यांना सुद्धा हेल्मेट वापरणे सक्तीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
देशात 1 जानेवारी 2026 पासून नवीन L2 श्रेणीतील दुचाकी वाहने, ज्यामध्ये 50 सीसी हून अधिक इंजिन क्षमता वा 50 किमी / प्रति तासाहून अधिक गती असलेल्या मोटरसायकल आणि स्कूटरला आता अँट-लॉक ब्रेकिंग सिस्टीम ABS, लावावे लागेल. त्यामुळे अपघातातून मोठे नुकसान होणार नाही. जीवित हानी टाळता येईल. अचानक ब्रेक लावल्यामुळे काही घटनांमध्ये दुचाकीस्वार तोंडावर, डोक्यावर आपटून त्यांची जीवित हानी होत असल्याची प्रकरणं समोर आली होती.
Two Helmet Rule Bike : सूचना आणि हरकती
या नियमांना अंतिम रूप देण्यापूर्वी परिवहन मंत्रालयाने देशभरातून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या काळात दुचाकीस्वार त्यांच्या हरकती आणि सूचना परिवहन मंत्रालयाला कळवू शकतील. या ईमेलवर (comments-morth@gov.in) त्यांना मते मांडता येतील. भारतात दरवर्षी दुचाकी वाहनांच्या अपघातांची संख्या मोठी आहे. दोन हेल्मेटमुळे आता वाहन चालक आणि पाठीमागे बसलेल्या प्रवाशाला हेल्मेट घालावे लागेल. त्यांच्या जीवाची काळजी सरकार या नियमाद्वारे करणार आहे.
हे सुद्धा वाचा
युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा … खासदार सुप्रिया सुळेंची सोशल मिडियावर खास पोस्ट