Ajit Pawar : घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही, बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू? अजित पवारांनी सांगितला लग्नाआधीचा ‘तो’ किस्सा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबतच्या लग्नाआधीचा घर बांधण्याचा किस्सा

Ajit Pawar : माझं ठरलं होतं की, घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी तरी? तेव्हा या निंबाळकर साहेबांनी मला मदत केली आणि मला 1000 पोती सिमेंट दिलं आणि माझं घर बांधून झालं आणि मग मी लग्न केलं, असा लग्नाआधीचा किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितला आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त UPSC व MPSC मध्ये सारथी संस्थेमार्फत प्रायोजित यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, मी पुण्यासोबत बीडचा देखील पालकमंत्री आहे.  शिवछत्रपतींचा आणि शाहू महाराजांचा आदर्श आपण नेहमीच डोळ्यासमोर ठेवतो. आज आपण शाहू महाराजांची 191 वी जयंती साजरी करत आहे.  शाहू महाराज यांचं नाव जगातील सामाजिक समतेचे प्रतिक म्हणून घेतलं जातं. देशात सामाजिक, आर्थिक विकास कसा साधायचा हा आदर्श शाहू महाराजांनी आपल्या पुढे घालून दिला.  सारथीच्या काही लोकांनी मला विनंती केली होती की, दादा रविवारी वेळ दिली तर बरं होईल. म्हणून मी रविवारी सकाळची वेळ दिली. सकाळी-सकाळी कार्यक्रम घ्यायला मला आवडतं. पण, माझ्यामुळे अनेकांची गैरसोय होते. सकाळपासून उभे राहावं लागतं. त्याबद्दल क्षमा मागतो, असे त्यांनी म्हटले.

सारथी संस्थेला साजेसे काम आपल्याला करावे लागेल

Ai चा वापर आता केला पाहिजे. सारथी संस्थेचे सगळे प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करावे लागतील.  राजश्री शाहू महाराजांच्या नावाने उभा असलेल्या सारथी संस्थेला साजेसे काम आपल्याला करावे लागेल.  त्यांच्या नावाला कुठेही कमीपणा येऊ देणार नाही, असा शब्द मी माझ्या परीने तुम्हाला सगळ्यांना देतो.  आपण भविष्यात अधिकारी होतो, सगळ्यांनी व्यवस्थित जबाबदारीने कामे पार पाडा. पण, कधी कधी चुकून आपलं काही चुकलं तर त्या ठिकाणी मोठी बदनामी अधिकारी म्हणून सहन करावी लागते, असे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.

अजित पवारांनी सांगितला लग्नाआधीचा ‘तो’ किस्सा

अजित पवार पुढे म्हणाले की, 80 च्या दशकात सिमेंटची मोठी टंचाई होती. या निंबाळकर साहेबांकडे सिमेंटचे परवाने द्यायची जबाबदारी होती. त्यावेळी मी यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, साहेब मी माझ्या काटेवाडीत घर बांधायला काढलं आहे. माझं ठरलं होतं की, घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी तरी? तेव्हा या निंबाळकर साहेबांनी मला मदत केली आणि मला 1000 पोती सिमेंट दिलं आणि माझं घर बांधून झालं आणि मग मी लग्न केलं, असा सुनेत्रा पवार यांच्यासोबत लग्न करण्याच्या आधी घर बांधण्याचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.

अजित पवारांचा नव्या अधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला

माझी नजर खूप बारीक आहे. सगळे म्हणतात की, दादा तुमची नजर बारीक आहे. पण, बारीक नजर असल्याचा फायदा होतो. सारथीची एवढी सुंदर इमारत माझ्या त्या बारीक नजरेमुळेच झाली आहे. सारथीच्या जागा घेताना मला भरपूर अडचणी आल्या. पुण्यात मी सगळ्या शासकीय इमारती बांधत आहे. मी तुम्हाला सगळ्यांना उत्तम इमारती बांधून देईल. पण, तुमच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवा. सगळी लोक लांब गावातून तुमच्याकडे येतात. कुणालाही काम न करता माघारी पाठवू नका, असा मोलाचा सल्ला अजित पवारांनी नव्या अधिकाऱ्यांना दिला.

आणखी वाचा 

Rule Changes From July 1: UPI पेमेंटपासून तात्काळ ट्रेन तिकिटापर्यंत अन् पॅन कार्डपासून GST रिटर्नपर्यंत; 1 जुलैपासून बदलणार ‘हे’ 5 मोठे नियम!

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon