टॉप हेडलाईन्स | 21 एप्रिल 2025 | सोमवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  1. अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी, मुंबईत सराफ बाजारात एक लाखांचा टप्पा ओलांडला

  2. उद्धव ठाकरेंनी ठरवलंय एक पाऊल पुढे टाकायचं, भूतकाळात जायचं नाही; खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

  3. इकडं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा, तिकडे पुण्यातील साखर संकुलात शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठकांचा धडाका

  4. चंद्र कुठे आहे बघून गावातला मुक्काम वाढवला: आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

  5. राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम: त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे थांबवावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका

  6. ED ही मोदी, शहा यांची वसूली गँग: काँग्रेस नेते पवन खेरा यांचा आरोप; मोदी जेवढे ट्रम्प एवढेच वस्तुस्थितीला घाबरत असल्याचा आरोप

  7. मनसे – ठाकरे गटाच्या युतीवर बोलू नका: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निगेटिव्ह सूर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना तंबी

  8. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात PI कुरुंदकरला जन्मठेप: पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय; कुंदन भंडारी, पार्डीकरला प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा

  9. कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे, परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा , शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संजय राऊतांना टोला

  10. निवडणुका होईनात, मनसेनं मुंबईत भरवलं प्रतिपालिका सभागृह; आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण

  11. मराठी संस्कृतीचा बालेकिल्ला असणाऱ्या पार्ल्यात जैन समाजाच्या मोर्चामुळे पालिकेच्या अधिकाऱ्याची बदली, संजय राऊत कडाडले

  12. माढ्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर, शिवाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तानाजी सावंतांचं नावच नाही, एकनाथ शिंदेंची कार्यक्रमाकडे पाठ

  13. माजी खासदार संजयकाका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, त्यामुळे त्यांचं पुर्नवसन अजितदादांनी करायचं, मी त्यांना मदत करणार, मंत्री चंद्रकांत पाटलांची ग्वाही

  14. भापजने रोहित पवारांचे 12 पैकी 8 नगरसेवक फोडले, कर्जत नगरपंचायतीत राम शिंदेंची सत्ता

  15. बारा लाखांची स्पोर्ट्स बाईक अन् डोक्यावर 70 हजारांचे हेल्मेट; कोल्हापुरातील उद्योजकाचा मुलाचा अपघाती मृ्त्यू, हेल्मेटचे सुद्धा तुकडे

  16. झिपलाईनिंग करण्यासाठी 30 फूटावर गेली, दोर अडकवण्यास स्टूलवर चढताच पाय सटकला ,पुण्यात तरुणीचा मृत्यू

  17. रोहित शर्मासह चौघे A+, BCCI कडून केंद्रीय करार जाहीर, अय्यर-ईशान किशनची एन्ट्री! बीसीसीयकडून 34 खेळाडूंवर पैशांचा पाऊस

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon