सांगली–विशाखापट्टणम, तिरुपती रेल्वे सुरू करावी – कामटे संघटना 

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला ( प्रतिनिधी)- प्रवाशांच्या मागणी नुसार सांगली –विशाखापट्टणम, तिरुपती रेल्वे तातडीने सुरू करावी अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

अशोक कामटे संघटनेने रेल्वे महाप्रबंधक  मुंबई , खासदार, आमदार यांना याबाबतचे निवेदन दिले . निवेदनात म्हटले आहे की सांगली, मिरज येथून सकाळी 6 नंतर कोणतीही रेल्वे सेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सांगली – विशाखापट्टणम रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना लाभ होईल, विशाखापट्टणम येथे पिटलाईन असल्याने गाडीचा मेंटेनेस होऊ शकतो. मिरज रेल्वे स्थानकावर पाणी भरण्याची सुविधा असल्याने हि रेल्वे गाडी सुरू करावी.

सांगली –पंढरपूर –सोलापूर –पुरी (ओडिशा), सांगली –सोलापूर– तिरुपती– चेन्नई या नवीन रेल्वे गाड्या सुरू कराव्यात . निजामाबाद –पंढरपूर गाडीचा विस्तार सांगलीपर्यंत करावा, हरिप्रीया एक्सप्रेस सध्या फुल आहे परिणामी पंढरपूर मार्गे तिरुपती, चेन्नई सेवा सुरू केल्यास प्रवाशांची सोय होणार आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस सुट्ट्यांचा कालावधी असल्याने प्रवाशी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, या मार्गावर रेल्वे प्रशासनाने कोणतेही विशेष उन्हाळी रेल्वे सेवा सुरू केली नाही त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. या निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, खासदार प्रणितीताई शिंदे, खासदार विशालदादा पाटील, खासदार धैर्यशील मोहिते– पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर, पुणे यांना ही पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

उन्हाळ्याचे दिवस, सुट्ट्यांचा कालावधी असल्याने दक्षिण ,उत्तर जाणाऱ्या रेल्वे फुलआहेत कोल्हापूर ,मिरजेतून हरिप्रिया एक्सप्रेस पूर्ण क्षमतेने धावत असल्याने 2–3 महिने तिकीट वेटिंग आहे, पर्यायी सांगली–पंढरपूर –सोलापूर मार्गे तिरुपती रेल्वे दररोज सुरू करणे आवश्यक आहे लवकरच सकारात्मक निर्णय होईल याकरीता अशोक कामटे संघटनेचा रेल्वे विभागाशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. 

निलकंठ शिंदे सर, अध्यक्ष:– शहीद अशोक कामटे संघटना ,सांगोला

हेही वाचा:

सांगोला च्या तरुणाचं नशीब उजळलं ! ड्रीम 11 मध्ये जिंकले 16 लाख रूपये

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon