टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Todays Gold Rate : आता सोने घेणे विसराच, एका रात्रीत सोने आणि चांदीचे भाव गगनाला, चांदी 20 हजारांनी महाग तर सोने तब्बल..

On: May 13, 2026 11:36 AM
Follow Us:

Todays Gold Rate Jalgaon : एका रात्रीत सोन्याच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुक्ल वाढवल्यानंतर मोठा परिणाम झाला. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली. चला तर जाणून घ्या आजचे सोन्याचे भाव.

Todays Gold Rate : आता सोने घेणे विसराच, एका रात्रीत सोने आणि चांदीचे भाव गगनाला, चांदी 20 हजारांनी महाग तर सोने तब्बल..

इराण आणि अमेरिका युद्धाला सुरूवात झाल्यापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सतत दरात चढउतार बघायला मिळाले. 28 फेब्रुवारी 2026 पूर्वी सोन्याचे दर प्रचंड वाढले होते. 2 लाखाच्या आसापास सोने गेले होते. मात्र, जसाही अमेरिकेने इराणवर हल्ला केला तसे सोन्याचे दर घसरले. यादरम्यान याचाच फायदा घेत अनेकांनी सोन्याची जोरदार खरेदी केली. मात्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे आवाहन करत 1 वर्षाकरिता सोने खरेदी न करण्याचे जनतेला सांगितले. मात्र, त्यानंतर दोन दिवस सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. आज सोने आणि चांदीचे भाव गगणाला पोहोचले आहेत. सोने 8 हजारांनी तर चांदी तब्बल 20 हजारांनी महाग झाली. सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली. केंद्र सरकाराने सोन्याच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली. पूर्वी सोन्यावरील आयात शुल्क 6 टक्के होते. आता त्यात वाट करून तब्बल 15 टक्के करण्यात आले.

जळगावच्या सराफ सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली. सोन्याच्या दरात तब्बल 8 हजार तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची वाढ झाली. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 63 हजार 770 रुपयांवर गेले. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 93 हजार रुपये झाले. ही अत्यंत मोठी वाढ म्हणावी लागेल. एकाच रात्रीत ही मोठी वाढ झाली. काल आणि परवा सोन्याचे भाव कमी होते.

आयात शुल्कात वाढ केल्याने परिणामी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सकाळी सोन्याचे दर तब्बल 14 हजारांनी महाग झाले होते, मात्र दोन तासात पुन्हा घसरण झाली. दिवसभरात सोन्या आणि चांदीच्या दरात चढउतार सुरू राहील, असे सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे. कारण जागतिक बाजारातही मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामध्येच केंद्र सरकारनेही आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला.

मागील काही वर्षात भारतात सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा आयात शुल्कात वाढ करण्यात आली. एक वर्ष सोने न खरेदी करण्याचे नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केले. मात्र, एक वर्षानंतर सोन्याचे भाव कमी होणार का? हा देखील प्रश्न विचारला जात आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now