राजकोटच्या नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; तलवारीच्या टोकापर्यंतची उंची तब्बल 83 फूट

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

गेल्या वर्षी योग्य देखभाल न केल्याने गंज आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पडलेल्या या पुतळ्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

Sindhudurg: मालवणच्या  ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज (11 मे 2025)  दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्य मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

गेल्या वर्षी योग्य देखभाल न केल्याने गंज आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पडलेल्या या पुतळ्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल माफी मागितली होती. त्यानंतर नव्या पुतळ्याची उभारणी ही भावनिक व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. शिल्पकार राम सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प साकारले आहे. त्यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण पुतळा साकारण्यात आला आहे. ह्या पुतळ्याची उंची तलवारीच्या टोकापर्यंत 83 फुट आहे.

नव्याने उभारलेल्या भव्य पुतळ्याचे विशैष्ट्य काय?

  • सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्ध समयी बाजात म्हणजेच योद्धा भूमिकेत (warrior pose) असलेल्या तलवारधारी 60 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे.
  • तलवारीसह पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी आहे. तसेच पुतळ्याच्या चबुतराची उंची १० फूट इतकी आहे.
  • जमीन पातळीपासून या पुतळ्याची एकूण उंची 93 फुट इतकी आहे.
  • पुतळा उभारण्यासाठी ब्राँझ धातूचा उपयोग करण्यात आला असुन यामध्ये 88% तांबे, 4% जस्त व 8% कथिल धातूचा समावेश आहे.
  • पुतळ्यासाठी सरासरी 6 ते 8 मिलिमीटर जाडीचे कांस्य वापरण्यात आले आहे.
  • या कामासाठी DUPLEX स्टेनलेस स्टीलचे सपोर्ट फ्रेमवर्क, स्टेनलेस स्टील SS 316 दर्जाचे सळई असे गंजरोधक बांधकाम साहित्य वापरण्यात आले आहे.
  • चबुतरासाठी उच्च दर्जाचे काँक्रीट तसेच स्टेनलेस सळई वापरण्यात आले आहे.
  • फियान, निसर्ग, तोक्ते यासारखी वादळे गेल्या काही वर्षात अधिकाधिक तीव्रतेची वारंवार उद्भवत आहेत. त्यानुसार सदर पुतळा सर्व वातावरणीय परिणामांच्या माऱ्यास योग्य प्रकारे तोंड येईल, या पद्धतीने संरचनात्मक संकल्पना करून बांधण्यात आला आहे.
  • पुतळ्याचे किमान आयुर्मान 100 वर्षे राहील अशा पद्धतीने ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांनी हे काम केले आहे. तसेच पुढील 10 वर्ष नियमित देखभाल व पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे.

सखोल अभियांत्रिकी व मजबूत रचना

या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी हे कार्यान्वयन यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. शासन निर्णय दिनांक 25 एप्रिल 2014 रोजी RS 31.57 लाखांची मान्यता देण्यात आली होती.पुतळ्यासाठी 55मेट्रिक टन Bronze C-3000धातू, 30मेट्रिक टन Duplex Stainless Steel Framework, तसेच 17 मेट्रिक टन Stainless Steel 410-L चा वापर करण्यात आला आहे. पुतळ्यासाठी 6–8 मिमी जाडीचे कांस्य वापरण्यात आले आहे.

संपूर्ण रचना IIT मुंबईच्या तज्ज्ञ सल्लागारांच्या संकल्पनांच्या आधारावर वातावरणीय परीस्थितीला तोंड देईल अशा बळकटपणे बांधण्यात आली आहे. या पुतळ्याचे कमाल आयुष्यमान 100वर्षे असून पुढील 10वर्षे ठेकेदाराकडून नियमित देखभाल व दुरुस्ती होणार आहे. राजकोट किल्ल्यालगत 98 गुंठे खाजगी जमीन संपादित करून शिवस्मृती प्रकल्प राबवला जाणार आहे. यामध्ये पुढील सुविधा प्रस्तावित आहेत: शिवकालीन वस्तूसंग्रहालय,प्रदर्शन गॅलरी (Exhibition Hall),अॅम्फीथिएटर,वाहनतळ (Parking),फूड प्लाझा,लँडस्केपिंग आणि गार्डन याचा समावेश आहे.

हेही वाचा:

Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचे ढग कायम; पुढील चार दिवस तीव्र सतर्कतेचा इशारा

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon