टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Jalgaon Accident: लग्नसोहळा आटोपून घराकडे परतणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात; नवरदेवाच्या काकाचा मृत्यू

On: May 11, 2025 11:20 AM
Follow Us:

Jalgaon News Today: भीषण अपघातात नवरदेवाचे काका दशरथ रतन चव्हाण हे जागीच ठार झाले असून अन्य नऊ वऱ्हाडी जखमी झाले आहेत .

जळगाव: लग्नसोहळा आटोपून घराकडे परतणाऱ्या वऱ्हाडाच्या क्रुझरला भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला असून या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून नऊ वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोयगाव तालुक्यातील फरदापुर तांडा येथील चव्हाण कुटुंबीय जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा (लहासर) येथून विवाह सोहळा आटोपून क्रुझरने (क्र. एम एच ०८ आर ३५२४ ) घराकडे परतत होते. मात्र जामनेर -पहूर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर कंपनीच्या कंटेनरने (जी जे १५ ए एक्स १४२५ ) जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन क्रुझर पलटली. या भीषण अपघातात नवरदेवाचे काका दशरथ रतन चव्हाण (६५ वर्ष) हे जागीच ठार झाले असून अन्य नऊ वऱ्हाडी जखमी झाले आहेत .

अपघाताबाबत माहिती मिळताच स्थानिकांसह वऱ्हाडातीलच अन्य वाहनांमधील नातेवाईकांनी जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढत पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरसह भरधाव वाहन चालवणाऱ्या चालकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

जखमींची नावे :

लखिचद शंकर चव्हाण (वय 50)
मोहनदास शंकर जाधव (वय 50)
विक्रम मोतीलाल चव्हाण (वय 25)
बाबू पांचु जाधव (वय 75)
उखा दलू राठोड (वय 65)
धिरलाल सदू राठोड (वय 65)
हिरा महारु चव्हाण (वय 58)
प्रतीक प्रवीण राठोड (वय 7)
भिवसिग मनुर चव्हाण (वय 75)

हेही वाचा

Raid 2 Box Office Collection Day 10: ‘रेड 2’चा बॉक्स ऑफिसवर भूकंप, दुसऱ्या शनिवारी छप्पडफाड कमाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now