T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा पराभव केला. झिम्बाब्वेने दिलेल्या 131 धावांचे आव्हान पाकिस्तानला पूर्ण करता आले नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत चालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला धूळ चारत सामन्यात विजयी आघाडी मिळवली. झिम्बाब्वेच्या विजयाचा जल्लोष सर्वत्र साजरा केला जात आहे.
झिम्बाब्वेने संघाने पाकिस्तान विरोधातील विजय संघातील सहकाऱ्यांसह मैदानावर साजरा केला. यावेळी संघातील खेळाडूंनी झिम्बाब्वेतील एका गीतावर ठेका धरला, सर्व खेळाडू टाळ्या वाजवत मैदानावर नाचताना दिसत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तर याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. भारत टी 20 विश्वचषक स्पर्धेतून लवकरच बाहेर पडेल. पुढच्या आठवड्यातील उपांत्य फेरीमध्ये भारत पराभूत होऊन मायदेशी परतेल, असे शोएबने म्हटले आहे. शोएबने काहीही संबंध नसताना या ठिकाणी भारताचा उल्लेख केला आहे.