टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Supriya Sule : महिला आरक्षणावर डिबेटचं चॅलेंज, उद्या मुख्यमंत्री बारामतीत आहेत, होऊन जाऊ दे, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की..

On: April 21, 2026 11:12 AM
Follow Us:

Supriya Sule : “भाजपला जर मनापासून महिलांना 33 टक्के आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांना कोणी थांबवलेलं नाही. 21 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेलं. 2024 मध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकली असती” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule : महिला आरक्षणावर डिबेटचं चॅलेंज, उद्या मुख्यमंत्री बारामतीत आहेत, होऊन जाऊ दे, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की..

“दादांची एनर्जी तुम्ही पाहिलेली आहे. आजही अंगावर काटा येते. सकाळी 8.30 वाजता विमान पडल्याचा तो फोन आलेला. तो दिवस आणि आजचा दिवस असं वाटतं, दादा खरच गेलाय का? कधी कधी असं वाटतं की दादा खरच गेलाय का, अशी भावना मनात येते. शेवटची ती भेट, एक फोन या गोष्टी मनात राहिल्या. विमान पडलं कसं? एका सेकंदात सगळं संपलं” अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. “बारामतीत बाबा सगळं इलेक्शन संपवून यायचे. प्रचाराची शेवटची सभा घ्यायचे. दादाने तीच परंपरा कायम ठेवली. दादा आणि साहेब फॉर्म भरणार आणि शेवटच्या सभेला येणार. बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. कौटुंबिक विश्वासाची नाती आहेत. काही कमी-जास्त झालं असेल, म्हणून आमच्या मनात, नात्यात कधी अंतर आलेलं नाही. इथून पुढे कधी येऊ देणारही नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“राहुल कुल यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. मी स्वत: 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. निवडणुकीत परस्पराविरोधात टोकाची भूमिका घेऊ. पण निवडून आल्यावर भागाचा विकास, लोकांची सेवा हेच डोळ्यासमोर असतं” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.”दादा गेल्यानंतरची सभा आहे. मला अंतकरणातून खूप दु:ख आहे. जड अंतकरणाने मी बारामतीला जात आहे. माझा भाऊ गेल्यानंतरची ही परिस्थिती आहे. दु:ख आहे” असं सुप्रिया सुळे बोलल्या.

2024 मध्ये 33 टक्के आरक्षण का दिलं नाही?

“मुख्यमंत्री म्हणाले की, महिलांना 33 टक्के आरक्षण देऊ शकतो. पण पक्षात देऊ शकत नाही. माझं म्हणणं असं आहे की, भाजपला जर मनापासून महिलांना 33 टक्के आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांना कोणी थांबवलेलं नाही. 21 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेलं. 2024 मध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकली असती. 543 पैकी 33 टक्के महिलांना आरक्षण द्या असं आम्ही म्हणत होतो. आम्ही रात्रभर बसायला तयार होतो, भाजप का करत नाहीय?. बिल 2023 रोजी पास झालं. अडीचवर्ष बिल पडून होतं. अमलबजावणी का झाली नाही? ममता बॅनर्जी यांच्या पक्षात 40 ते 50 टक्के महिला खासदार आहेतठ असं सु्प्रिया सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीने वेळ द्यावा

“मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलावलं तर अतिशय विनम्रपणे आमची बाजू मांडायला जाऊ. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीने वेळ द्यावा” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. पत्रकारांनी त्यांना विचारलं की, उद्या मुख्यमंत्री बारामतीला सांगता सभेला येणार आहेत, चार वाजता तेव्हा आमने-सामने होऊन जाऊ दे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी ‘खेड शिवापूरला उद्या संध्याकाळी 6 वाजता लग्नाला जायचं आहे’ असं उत्तर दिलं.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now