टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sunetra Pawar Speech Baramati Vidhan Sabha By Election 2026: मी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी; बारामतीत अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवार भावूक!

Sunetra Pawar Speech Baramati Vidhan Sabha By Election 2026: पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी बारामतीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी भाषण केलं. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्या.

Sunetra Pawar Speech Baramati Vidhan Sabha By Election 2026: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज बारामती पोटनिवडणुकीचा (Baramati Vidhan Sabha By Election 2026) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ, दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, चेतन तुपे, सना मलिक, सरोज अहिरे, अनिकेत तटकरे, अंकिता पाटील,व अनिल पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, उमेश पाटीलसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी बारामतीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी भाषण केलं. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्या. दोन महिन्यांआधी अजितदादांना गमावलं. अजितदादा आपल्यात नाही, असं आजही वाटत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, की बारामतीची पोटनिवडणुक होईल. अजितदादांनी शेवटचा श्वासही बारामतीत घेतला, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. बारामतीकरांकडे बघूनच मला धीर आला, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितले. (Sunetra Pawar Speech Baramati Vidhan Sabha By Election 2026)

अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी- सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Speech Baramati Vidhan Sabha By Election 2026)

बारामतीच्या प्रत्येक वास्तुला अजितदादांचा स्पर्श आहे. बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. अजितदादांनी मताधिक्यांचे विक्रेम मोडून काढले आहेत. ही निवडणूक नाही, अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं. अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प, गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करेन, असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी यावेळी दिलं. बारामतीमधील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. ही निवडणूक ही माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही काकणभर (थोडी अधिक) मला जास्त साथ द्याल, असा विश्वास मला आहे, असं सुनेत्रा पवारांनी सांगितले.

4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून म्हणून 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायाची ताकद मिळेल- (Sunetra Pawar Speech Baramati)

बारामतीचा विकास कायम सुरू राहील. प्रशासनावर दरारा राहील, बारामतीची ओळख तशीच राहील. गुंडागर्दी आणि खंडणीला थारा मिळणार नाही. आता विकास थांबणार नाही याची खात्री बाळगा, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. महायुतीचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे. अजितदादांचा विचाराचा वारसा सांभाळात मी काम करीत राहील. 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून म्हणून 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायाची ताकद मिळेल, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण त्यांचा विचार पुढे घेऊन जाते. जय पवार आणि पार्थ पवार हे माझं कुटुंब नाही. तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही. अजितदादांचा जनता दरबार सुरू राहील. बारामतीचा विकास कायम सुरू राहील, अशी ग्वाही सुनेत्रा पवारांनी दिली.

बारामती विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान- (Baramati By Election 2026)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे.  बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Iran War Live Update: अमेरिकेची मुख्य अट, इराणच्या सुद्धा अटी अन् 45 दिवस युद्धबंदीचा प्रस्ताव ! उद्या संध्याकाळपर्यंत तोडगा निघणार? नेमकं काय घडतंय??

LPG Crisis: गॅस बुकिंगबाबत नवीन अपडेट, या ग्राहकांना 1 जुलैपासून मिळणार नाही सिलिंडर

India Oil Update : ऑइल इंडियाला सलाम, राजस्थानच्या वाळवंटात जे अशक्य वाटलं ते देशासाठी करुन दाखवलं, तेल उत्पादनात चांगली बातमी

Sagar Karande: ना रडापडी, ना कसला ड्रामा.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला सागर कारंडे; बाहेर येताच रितेश भाऊंना म्हणाला…

गुड न्यूज, लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना, मोठी घोषणा, किती पैसै मिळणार?

Gold Price Today : सोनं उच्चांकापेक्षा स्वस्त, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरले भाव, जाणून घ्या आजचे दर