टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

कुणाला 5 , तर कुणाला शून्य मते… महाविकास आघाडीचा सर्वात वाईट पराभव; 17 पैकी 17 जागांचा निकाल एका क्लिकवर

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 पैकी 16 जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेससह आघाडीच्या उमेदवारांना अत्यंत कमी मते मिळाल्याने त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. काँग्रेसच्या काही उमेदवारांना तर केवळ 5 ते 31 मतेच मिळाली, ज्यामुळे त्यांचा सर्वात वाईट पराभव स्पष्ट झाला.

कुणाला 5 , तर कुणाला शून्य मते... महाविकास आघाडीचा सर्वात वाईट पराभव; 17 पैकी 17 जागांचा निकाल एका क्लिकवर

राज्यातील 17 पैकी 11 विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत 17 पैकी 16 जागा महायुतीने जिंकल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आलेली नाही. उलट महाविकास आघाडीची या निवडणुकीतील कामगिरी अत्यंत वाईट झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमदेवारांची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. कुणाला 5 मते मिळाली तर कुणाला शून्य मते मिळाली आहे. खासकरून देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचं दिसून आलं आहे. प्रत्येक मतदारसंघातील निकालाचा घेतलेला हा आढावा.

कुठे कुणाचा विजय –

>> सोलापूर – एकूण मतदार 616

राजेंद्र राऊत (भाजप) – 483

वसंतराव देशमुख (शरद पवार गट) – 118

>> जळगाव – एकूण मतदार 630

नंदकुमार महाजन (भाजप) – 577

शरद तायडे (ठाकरे गट) – 5

>> सांगली सातारा – एकूण मतदार 895

धैर्यशील कदम (भाजप) – 591

अभयसिंह जगताप (शरद पवार गट) – 295

>> नांदेड – एकूण मतदार 452

अमर राजूकर (भाजप) -339

कृष्णा आष्टीकर ( ठाकरे गट) – 84

>> भंडारा- गोंदिया – एकूण मतदार 457

अविनाश ब्राह्मणकर (भाजप) – 304

नरेश ईश्वरकर (मविआ पुरस्कृत) – 152

>> अमरावती – एकूण मतदार – 451

डॉ. प्रविण पोटे (भाजप) – 390

निलेश विश्वकर्मा (वंचित आघाडी) – 31

हर्षजित देशमुख (काँग्रेस) – 0

>> धाराशीव-लातूर- बीड – एकूण मतदार – 988

बसवराज पाटील (भाजप) -845

महेश देशमुख (काँग्रेस) – 124

>> छत्रपती संभाजीनगर- जालना- एकूण मतदार – 637

सुहास शिरसाट (भाजप) – 454

गणेश लोखंडे (ठाकरे गट) – 134

>> नागपूर – एकूण मतदार – 836

डॉ. राजीव पोतदार (भाजप) – 682

अतुल लोंढे ( काँग्रेस)  – 130

>> परभणी – हिंगोली – एकूण मतदार – 466

सईद खान (शिवसेना) – 242

डॉ. विवेक नावंदर (ठाकरे गट) – 159

>> नाशिक – एकूण मतदार – 619

गोकुळ गिते (अपक्ष) – 357

नरेंद्र दराडे (शिवसेना) – 248

बिनविरोध –

प्राजक्त तनपुरे (भाजप) – अहिल्यानगर

अरुण लखानी (भाजप) – वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली

रविंद्र फाटक (शिवसेना) – ठाणे-पालघर

दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – यवतमाळ

विक्रम काकडे (राष्ट्रवादी) – पुणे

अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) – रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत खेळ संपवला

परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना: हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 7 भाविकांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी; VIDEO

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

तुपकरांच्या आंदोलनाचा मुंबईत भडका, भरसमुद्रात जलसमाधी आंदोलन, मोठा थरार, पोलिसांची दमछाक

Horoscope Today 16th June 2026 : व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये रहा सावध, मुलांच्या लग्नाची समस्या आज सुटणार, कोणाला मिळणार गुड न्यूज? .. वाचा तुमचं भविष्य !

रोहित पवारांचे कुटुंबीय भावूक; आईने हात जोडले, पंढरपुरात वडिलांचे हाल पाहून मुलांचे डोळे पाणावले