टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

Follow Us:

Brother and sister Drown: सोलापूरमध्ये एक हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. शेततळ्यात पोहत असताना लहान सख्ख्या भाऊ-बहिणीचा बुडून मत्यू झाला आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भाऊ-बहि‍णीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहीण-भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात कारकल येथे घडली आहे. श्रवण संतोषकुमार अंकलगी (वय १५) व श्रावणी संतोषकुमार अंकलगी (१०), असे मृत्यू झालेल्या बहीण-भावाचे नाव आहे.

नेमकी घटना कशी घडली-

संतोषकुमार अंकलगी यांचे काही वर्षापूर्वी अपघातात निधन झाले. उषा संतोषकुमार अंकलगी या आई महादेवी कोळी या दोन्ही मुलांबरोबर कारकल येथील शेतात राहतात. अंकलगी यांचे शेत विद्यानंद वालीकर हे बटईने करत होते. रविवारी उषा अंकलगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या. श्रवण हा शाळेला सुट्टी असल्याने विंचूरवरून घरी कारकलला आला होता. दुपारी दीडच्या दरम्यान श्रवण आणि श्रावणी शंभर बाय शंभर शेततळ्यात पोहण्यासाठी गेले यावेळी शेततळ्यातून बाहेर पडता यावे, यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधून ती कमरेला बांधले होते. मात्र, दुदैवाने झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि दोघेजण पाण्यात बुडू लागले. पण त्यांना वाचविण्यासाठी कोणीच नव्हते.

आजीला संशय आला आणि त्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली-

आजी महादेवी कोळी यांना संशय आला .नात,नातू शेततळ्यात जाऊन खूप वेळा झाले तरी त्याचा पोहण्याचा आवाज येत नव्हता. आजी महादेवी कोळी यांनी शेततळ्याकडे गेल्या असता श्रवण आणि श्रावणी पाण्यात बुडाल्याचे दिसले. आजीने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून विद्यानंद वालीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शेजारील मल्लिकार्जुन सोनगी, महादेव कांबळे आणि वालीकर या तिघांनी शेततळ्यात उडी घेऊन श्रवण व श्रावणी यांना बाहेर काढले. दोन्ही चिमुकले बेशुद्धावस्थेत आढळून आले. उपचारासाठी मंद्रप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून दोघांना मृत घोषित केले . याचा अधिक तपास पोलिस हवालदार विठ्ठल बिराजदार हे करीत आहेत.

अंकलगी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर-

या घटनेमुळे अंकलगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही वर्षांपूर्वीच या मुलांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. वडील नसल्यामुळे आई आणि आजीने मोठ्या कष्टाने या दोन्ही मुलांचा सांभाळ केला होता. मात्र, काळाने घाला घातल्याने दोन्ही मुले एकाच वेळी हिरावली गेली. दक्षिण सोलापूर तालुक्यात दुःख व्यक्त होत आहे. या घटनेमुळे औज मंद्रूपसह संपूर्ण दक्षिण सोलापूर परिसरात शोककळा पसरली असून, शेततळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा