टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Crude Oil Price: भारताची चिंता वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाचा भडका; क्रूड ऑईल 105 डॉलरच्या पार

Crude Oil Price : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ईराणवरील आक्रमक विधानामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा भडका उडाला असून क्रूड ऑईल 105 डॉलरच्या पार गेले आहे.

Crude Oil Price : जागतिक राजकारणातील एका मोठ्या घडामोडीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ (Crude Oil Price Hike) झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ईराणविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव 105 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम आशियाई शेअर बाजारावर झाला असून बाजार कोसळले आहेत.

Donald Trump: ट्रम्प यांचे विधान अन् कच्च्या तेलाच्या दरात भडका

डोनाल्ड ट्रम्प यांनी ईराणमधील युद्धाच्या परिस्थितीवर भाष्य करताना अत्यंत कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “आम्ही ईराणला कधीही अण्वस्त्र सज्ज होऊ देणार नाही. त्यांच्याशी कोणताही करार केला जाणार नाही. येत्या 2 ते 3 आठवड्यांत आम्ही मोठी कारवाई करणार असून अमेरिकन सैन्य आपल्या लक्ष्यांच्या खूप जवळ आहे.”

ट्रम्प यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पूर्णपणे सुरक्षित केली जाईल. जे देश या मार्गावरून तेल आयात करतात, त्यांनी सुरक्षिततेसाठी पुढे यावे, अमेरिका त्यांना मदत करेल. ट्रम्प यांच्या या विधानानंतर अवघ्या काही तासांत तेलाच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली.

Crude Oil Price Hike: किमतीत विक्रमी वाढ, एका दिवसात 8 डॉलरची झेप

बुधवारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड 100 डॉलरच्या खाली व्यवहार करत होते. मात्र, ट्रम्प यांच्या भाषणानंतर यात 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड: 106.22 प्रति बॅरल (5 टक्के वाढ), अमेरिकन क्रूड (WTI): 104.36 प्रति बॅरल (4.2 टक्के वाढ). एका दिवसापूर्वीच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 8 डॉलर प्रति बॅरलची वाढ झाली आहे.

Stock Market: भारतीय बाजारात घबराट; शेअर बाजार कोसळण्याचे संकेत

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारतासाठी मोठा धक्का आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. कच्च्या तेलाचा दर वाढल्याने भारताचे आयात बिल वाढणार असून महागाईचा धोकाही संभवतो. तर जागतिक तणावाचे सावट शेअर बाजारावरही स्पष्टपणे दिसत आहे. एशियाई बाजारात जपानचा निक्केई 225 हा 1.4 टक्क्यांनी घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी 3.4 टक्क्यांनी कोसळला आहे. हाँगकाँगच्या हँग सेंग मध्येही 0.8 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर भारतीय शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. गिफ्ट निफ्टी (Gift Nifty) 450 अंकांच्या घसरणीचे संकेत देत असून आज भारतीय बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता आहे.

Donald Trump: पुढील 2-3 आठवडे धोक्याचे?

ट्रम्प यांनी उल्लेख केलेली ‘मोठी कारवाई’ आणि 2 ते 3 आठवड्यांचा कालावधी यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कच्च्या तेलाचे भाव दर तासाला वाढत असून जर ही स्थिती कायम राहिली, तर पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

Mount Everest: एव्हरेस्ट शिखरावर विक्रमी चढाई केली, पण उतरताना आक्रीत घडलं; दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी अंत

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..