टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Solapur News : सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेवर काळाचा घाला, विचित्र अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू , कशी घडली घटना?

Follow Us:

Accident NNews : सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासु सुनेवर काळाने घाला घातला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने थांबलेल्या ट्रकला धडक दिली. आणि त्या ट्रकचा धक्का दुचाकीला बसला.

पंढरपूर : कांद्याने भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासु सुनेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील दामाजी कारखाना रोड या ठिकाणी रविवारी (3) घडली. रेणुका विजय तासगावकर (वय 38) तर शालिनी पांडुरंग तासगावकर (वय 56) अशी मरण पावलेल्या सासु सुनेची नावे आहेत याबाबत विजय तासगावकर राहणार मंगळवेढा यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यात टोलनाक्याच्या पलीकडे सद्गुरूंच्या बैठकीसाठी रविवारी सकाळी धर्मगाव रोडवरुन सासू-सून घरापातून दुचाकीवर निघाल्या होत्या. त्या धर्मगाव बायपास रोडवर दामाजी कारखाना चौकातून जात होत्या. तेवढ्यात त्यांच्या पाठीमागून कांद्याची पोती भरलेल्या ट्रकने, त्याठिकाणी थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ट्रकच्या डाव्या बाजूने चाललेल्या दुचाकीला, थांबलेल्या ट्रकची धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील रेणुका तासगावकर व सासू शालिनी तासगावकर या दोघी ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कांद्याने भरलेल्या ट्रकने एवढी जोरात धडक दिल्याने मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत त्याठिकाणी आले. त्यांनी ट्रक ड्रायव्हरला पकडून ठेवले. दरम्यान या घटनेची माहिती लोकांनी पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी ओळखपत्राद्वारे मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. ही माहिती मिळताच मृतांचे कुटुंबीय घटनास्थळी आले. आपल्या नातेवाईकांना पाहून कुटुंबीयांनी टाहो फोडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा