टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Solapur News : सोलापुरात होंडा दुचाकी गोडाऊनला भीषण आग; २५ लाखांचे नुकसान, दोन कोटींचा माल वाचला

On: May 17, 2026 8:01 PM
Follow Us:

Solapur News : जुळे सोलापुरातील वानकर नगर परिसरातील होंडा दुचाकी गोडाऊनला सोमवारी सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. पत्र्याच्या शेडमधील गोडाऊनमध्ये काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले.

फोटो सौजन्य - Social Media
  • अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे तब्बल दोन कोटी रुपयांचा दुचाकी व साहित्यसाठा वाचवण्यात यश आले.
  • दोन कोटी रुपयांचा माल वाचल्याचे सांगण्यात आले.
  • दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Solapur News : जुळे सोलापुरातील वानकर नगर परिसरात असलेल्या होंडा दुचाकी गोडाऊनला सोमवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या या गोडाऊनमध्ये काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. या घटनेत अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, महापालिका अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे तब्बल दोन कोटी रुपयांचा दुचाकी व साहित्यसाठा वाचवण्यात यश आले.

वानकर नगर येथील देविका गॅस एजन्सीजवळ प्लॉट क्रमांक ३१४ मध्ये हे गोडाऊन आहे. सोमवारी सकाळी सुमारे ११.१४ वाजण्याच्या सुमारास येथे आग लागल्याची माहिती महापालिका अग्निशमन दलाला मिळाली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने तसेच त्यांचे स्पेअर पार्ट्स आणि अन्य साहित्य साठवलेले होते. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते, तर ज्वाळा दूरवरूनही दिसत होत्या.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे यांच्या आदेशानुसार होटगी नाका अग्निशमन केंद्रातील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी त्वरित बचावकार्य सुरू करत आग आणखी पसरण्यापूर्वी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी पाण्याचा मारा करत अवघ्या पाऊण तासात आग आटोक्यात आणली. अधीक्षक राकेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधीक्षक अच्युतराव दुधाळ यांच्या नेतृत्वात जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणातील दुचाकी वाहने आणि इतर साहित्य आगीपासून सुरक्षित ठेवण्यात यश आले. या कारवाईमुळे सुमारे दोन कोटी रुपयांचा माल वाचल्याचे सांगण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now