टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Solapur : अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल, धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

On: June 18, 2026 7:11 PM
Follow Us:

विधानपरिषद निवडणुकीत आम्ही सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे 16 मतांनी सुरुवात केली होती. पण 22 तारखेला आमचा विजय होईल असा विश्वास शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

Dhairyasheel Mohite Patil :  विधानपरिषद निवडणुकीत आम्ही सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे 16 मतांनी सुरुवात केली होती. पण 22 तारखेला आमचा विजय होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील अदृश्य शक्ती आमच्या सोबत होती. अदृश्य शक्तीने आम्हाला साथ दिल्याचा दावा देखील मोहिते पाटलांनी केला. 22 तारखेला मतदानाची आकडेवारी तुम्हाला समजेल. या दुष्काळमध्ये वसंत बहरेल अस मोहिते पाटील म्हणाले.

कॅमेरा असलेल्या गॉगल घालून एक मतदार आले होते

सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटचे खासदार धैर्यशील मोहिते आणि सोलापूर विधानपरिषदेचे उमेदवार वसंतराव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोहिते पाटील बोलत होते.  कॅमेरा असलेल्या गॉगल घालून एक मतदार आले होते. त्यांचा हक्क हिरावून घेऊ म्हणून फक्त आम्ही ऑबजेक्शन घेतलं. मतदानाचा पुरावा म्हणून फोटो काढून नेत्यांना दाखवायचं असा विषय होता असे मोहिते पाटील म्हणाले. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतः कॅमेरा असलेला गॉगल दाखवल्याचं पाहायला मिळालं.

मालकाजवळ अस्तित्व दाखवण्यासाठी गरजेचं असतं म्हणून ते टीका करतात, मोहिते पाटलांचा सातपुतेंना टोला

मालकाजवळ अस्तित्व दाखवण्यासाठी गरजेचं असतं म्हणून ते टीका करतात असा टोला मोहिते पाटील यांनी माजी आमदार राम सातपुते यांना लगावला. उत्तम जानकर यांचा विषय हा आमच्या घरातला आहे. आम्ही तो विषय घरात मिटवू असेही धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now