Satish Bhosale Khokya Beed: भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या तब्बल वर्षभरानंतर कारागृहाबाहेर पडला.
एका वर्षांमध्ये पूर्ण माझ्या जीवनाची कमाई आणि मी पूर्णपणे बरबाद झालो. आज पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं आहे. घरातील लेकरा बाळाचा आई-वडिलांना राहिला छत नाही. सगळं हिसकावून घेतलं, असं सतीश भोसले म्हणाला. जेलमधून सुटून आल्यानंतर सतीश भोसले हा त्याच्या शिरूर कासार येथील राहत्या घरी आला. यावेळी वनविभागाने अतिक्रमण म्हणून खोक्याचे घर पाडलेले उध्वस्त झालेला घर संसार पाहून हे पूर्णपणे उध्वस्त झाल्याच्या भावना सतीश भोसलेने व्यक्त केल्या. (Satish Bhosale Khokya Beed)
सत्याचा विजय झाला, माझ्या कुटुंबावर अन्याय झाला- सतीश भोसले (Satish Bhosale Khokya)
सत्याचा विजय झालेला आहे. माझ्यावर आरोप केले होते. कोर्टात सत्य आहे ते समोर आले. माझी निर्दोष मुक्तता झाली माझा न्यायदेवतेवर विश्वास होता. न्याय देवतेने मला न्याय दिला त्याबद्दल खूप खूप आभार मानतो. वायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता ही खोटी होती. मला टार्गेट करून माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय केलेला आहे, असंही सतीश भोसले म्हणाला.
नेमकं प्रकरण काय? (Satish Bhosale Khokya)
सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच दरम्यान एका व्यक्तीला आपल्या साथीदारासोबत बॅटने अमानुष मारहाण करताना खोक्या भोसलेचा व्हिडीओ समोर आला. याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेत खोक्याला अटक केली होती. या प्रकरणासोबतच शिरूर तालुक्यातील पिता-पुत्रांना मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार करून हरणाचे मांस घरात आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
गाडीच्या डॅशबोर्डवर पैशांची बंडल दाखवणे, हेलिकॉप्टर मधून एन्ट्री आणि पंचतारांकित हॉटेलमधील लॅविश लाइफस्टाइल असा थाट खोक्या भोसलेचा रिल्समधून समोर आला होता. खोक्या भोसले कारागृहात असताना त्याचे शिरूर मधील वनविभागाच्या जागेत असलेले ग्लास हाऊस जमीनदोस्त करण्यात आले. तर काही अज्ञातांनी त्याच ठिकाणी आग लावली होती. यावेळी सुरेश धस यांनी खोक्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. दरम्यान वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याची निर्दोष मुक्तता तर बॅटने मारहाण केल्याप्रकरणी जामीन मंजूर झाला. कारागृहा बाहेर पडताच खोक्या भोसलेची आणखी एक रील्स चांगलीच व्हायरल होत आहे.
हे सुद्धा वाचा
Phaltan Doctor Case: फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर








