टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अगं बाई.. खाली बस, आऊट नाहीये तो ! आनंदाने नाचणाऱ्या साक्षीला धोनीने बसवलं शांत, सगळ्यांना हसू अनावर

Sakshi Dhoni Viral Video : टी 20 वर्ल्डकमधील भारत वि. इंग्लंड सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक तर होतेच, पण क्रिकेट जगतातील अनेक दिगज्जांनीदेखील वानखेडेवर हजेरी लावली होती. भारताचा माजी कर्णधार, कॅरप्टन कूल, महेंद्रसिंग धोनी हाही पत्नी साक्षीसोबत मॅचचा आनंद लुटत होता. यावेळचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. धोनी आणि साक्षीचे क्युट क्षण, त्यांचा मस्तीभरा अंदाज यामध्ये दिसला आहे.

Saskhi MS Dhoni Video : अगं बाई.. खाली बस, आऊट नाहीये तो ! आनंदाने नाचणाऱ्या साक्षीला धोनीने बसवलं शांत, सगळ्यांना हसू अनावर

मुंबईतील वानखेड़े स्टेडियमवर टी 20 वर्ल्डकमधील भारत वि. इंग्लंड हा हायव्होल्टेज सामना झाला. भारताने इंग्लंडला हरवून फायनलमध्ये ध़क मारली. आता 8 मार्च रोजी न्युझीलंड आणि भारत यांच्या विजेतेपदासाठी लढत होणार असून विजेता संघ हा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावणार आहे. भारत वि. इंग्लंड हा सामना पाहण्यासाठी काल वानखेडेवर अनेक सेलिब्रिटी, तसेच क्रिकेटरही हजर होते, यावेळी कॅप्टन कूल, माही अर्थात महेंद्रसिंग धोनीन यानेही मॅचचा आनंद लुटला. या सेमीफायनलदरम्यान एमएस धोनीची पत्नी साक्षी हिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मॅचच्या शेवटच्या काही षटकांदरम्यान तिने एका चेंडूवर विकेट पडल्याचा विचार करत आनंद साजरा केला, मात्र तो खरा ाऊट नव्हता. साक्षी नाचायला लागलेली पाहून धोनी हसायला लागला आणि त्याने तिला शांत केलं. बुमराहच्या गोलंदाजी दरम्यान घडलेल्या या मजेशीर क्षणाचा व्हिडीओ पाहता पाहता प्रचंड व्हायरल झाला आहे.

साक्षी -धोनीचा क्युट व्हिडीओ व्हायरल

18 व्या षटकांत बुमराह गोलंदाजी करत होता, तेव्हा ही मजेशीर घटना घडली. खरंतर, सॅम करनने त्या 18 व्या ओव्हरमधील पहिला चेंडू बुमराहकडे वळवला. ते पाहून साक्षीला वाटलं की बुमराहने झेल टिला आणि भारताला विकेट मिळाली. तेपाहून ती उभी राहून आनंदाने टाळ्या वाजवायला लागली, खूप खुश झाली. पण प्रत्यक्षात, चेंडू बॅटला लागल्यानंतर एकदा जमिनीवर आदळला होता, त्यानंतर बुमराहने तो कॅच टिपला, त्यामुळे फलंदाज आऊट झाला नाही आणि भारताला विकेटही मिळाली नाही.

साक्षीचं सेलिब्रेशन सुरू असताना धोनी तिच्या मागेच उभा होता. तिला झालेला आनंद पाहून आधी तो हैराण झाला आणि नंतर हसत हसतच त्याने तिला शांत केलं. विकेट मिळाली नाहीये, फलंदाज बाद नाहीये असं सांगत त्याने तिला शांत करत खाली बसायला सांगितलं. धोनीने ज्या पद्धीतने साक्षीला ते सांगितलं, तो मजेशीर क्षण आता व्हायरल झाला असून चाहत्यांना हा अंदाज खूप आवडला आहे. धोनी स्वतः देखील साक्षीच्या सेलिब्रेशनवर हसताना होता आणि आजूबाजूच्या लोकांनाही हसू आवरलं नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत.

 

भारताचा दणदणीत विजय

कालच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला. एका उच्च धावसंख्येच्या सामन्यात भारताने इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला 7 विकेट गमावून केवळ 246 धावा करता आल्या. हा भारताचा चौथा टी20 वर्ल्डकप फायनल सामना असेल. न्युझीलंडच्या संघाशी भारतीय खेळाडू भिडणार आहेत. सर्वांच लक्ष आता 8 मार्चच्या सामन्याकडे लागलं आहे.

या सेमीफायनल मॅचमध्ये अनेक मोठे विक्रम रचले गेले. टीम इंडियाने चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला. भारतीय संघ टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठणारा संघ बनला आहे. 2007, 2014, 2024 नंतर आता परत 2026 ला टीम इंडिया फायनलमध्ये आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचण्याची ही चौथी वेळ आहे. या सामन्यात एकूण 34 षटकार मारण्यात आले, जे एका टी20 वर्लडकप सामन्यातील सर्वाधिक आहेत. यापूर्वी, याच विश्वचषकात वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात एकूण 31 षटकार मारण्यात आले होते.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

Mount Everest: एव्हरेस्ट शिखरावर विक्रमी चढाई केली, पण उतरताना आक्रीत घडलं; दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी अंत

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..