सांगोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचना जाहीर; 7 जिल्हा परिषद गटामध्ये 102 गावे समाविष्ट

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

7 जिल्हा परिषद गट तर 14 पंचायत समिती गणांचा समावेश

21 जुलै पर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची संधी

सांगोला (प्रतिनिधी):- 2025 मध्ये होणार्‍या सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणार्‍या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. 21 जुलै पर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची संधी नागरिकांना देण्यात आली आहे.

ग्राम विकास विभाग यांच्या 12 जून रोजीच्या शासन आदेशानुसार हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या अधिसूचनेनुसार सांगोला तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी महुद बु, एखतपूर, जवळा, कडलास, चोपडी, कोळा आणि घेरडी हे 7 गट आहेत या 7 जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 76 ग्रामपंचायतीचा समावेश असून 102 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या 7 गटामध्ये एकूण लोकसंख्या 2 लाख 88 हजार 524 इतकी आहे.

पंचायत समित्यांसाठी 14 गण निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सदस्य संख्या देखील नेमून देण्यात आली आहे.पंचायत समितीसाठी महूद बु, चिकमहुद, वाकी(शिवणे), एखतपूर, वाढेगाव, जवळा, कडलास, अजनाळे, राजुरी, चोपडी, कोळा, जुनोनी, सोनंद आणि घेरडी अशा 14 पंचायत समिती गणांचा समावेश आहे.


महूद जिल्हा परिषद गटांमध्ये महूद बु, ढाळेवाडी, महिम, कारंडेवाडी, खिलारवाडी, चिकमहूद, जाधववाडी, बंडगरवाडी, कटफळ, इटकी, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवीलोटेवाडी, सातारकरवस्ती आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे.

एखतपूर जिल्हा परिषद गटामध्ये वाकी शिवणे, नरळेवाडी, अचकदाणी, लक्ष्मीनगर, बागलवाडी, सोनलवाडी, हलदहिवडी, गायगव्हाण,एखतपूर, शिवणे, चिंचोली, धायटी, शिरभावी, मेटकरवाडी आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे.

जवळा जिल्हा परिषद गटामध्ये वाढेगाव, बामणी, संगेवाडी, मांजरी, देवकतेवाडी, मेथवडे, देवळे, सावे, राजापूर, जवळा, मेडशिंगी, बुरलेवाडी, आलेगाव, वाकी(घेरडी) व वाणीचिंचाळे आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे.

कडलास जिल्हा परिषद गटामध्ये कडलास, अकोला, वासूद, केदारवाडी, वाटंबरे, अजनाळे, लिगाडेवाडी, कमलापूर, गोडसेवाडी, चिणके, य.मंगेवाडी आणि वझरे आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे.

चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये उदनवाडी, कारंडेवाडी, झापाचीवाडी, राजुरी, अनकढाळ, मानेगाव, हणमंतगाव, पाचेगाव, मिसाळवाडी, नलवडेवाडी, निजामपूर, लोणविरे, बलवडी, चोपडी, बंडगरवाडी, नाझरे, सरगरवाडी, सोमेवाडी, बुध्देहाळ, करांडेवाडी आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे.

कोळा जिल्हा परिषद गटामध्ये कोळा, कराडवाडी, कोंबडवाडी, किडबिसरी, पाचेगाव बु, जुनोनी, काळूबाळूवाडी, हातीद, तिप्पेहळ्ळी, जुजारपूर, गुणापवाडी, ह.मंगेवाडी आणि गौडवाडी आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे.

घेरडी जिल्हा परिषद गटामध्ये सोनंद, गळवेवाडी, डोंगरगाव, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी, घेरडी, हंगिरगे, गावडेवाडी, पारे, डिकसळ, नराळे आणि हबीसेवाडी आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे.

पंचायत समितीसाठी महूद पंचायत समिती गणामध्ये महुद बु, ढाळेवाडी, महिम, कारंडेवाडी, खिलारवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

चिकमहूद पंचायत समिती गणामध्ये चिकमहुद, जाधववाडी, बंडगरवाडी, कटफळ,इटकी, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी, सातारकरवस्ती या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

वाकी शिवणे पंचायत समिती गणामध्ये वाकी शिवणे, नरळेवाडी, अचकदाणी, लक्ष्मीनगर, बागलवाडी, सोनलवाडी, हलदहिवडी, गायगव्हाण या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

एखतपूर पंचायत समिती गणामध्ये एखतपूर, शिवणे, चिंचोली, धायटी, शिरभावी, मेटकरवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

वाढेगाव पंचायत समिती गणामध्ये वाढेगाव, बामणी, संगेवाडी, मांजरी, देवकतेवाडी, मेथवडे, देवळे, सावे, राजापुर या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

जवळा पंचायत समिती गणामध्ये जवळा, मेडशिंगी, बुरलेवाडी, आलेगाव, वाकी घेरडी, वाणीचिंचाळे या गावांचा समावेश आहे.

कडलास पंचायत समिती गणामध्ये कडलास, अकोला, वासूद, केदारवाडी, वाटंबरे या गावांचा समावेश आहे.

अजनाळे पंचायत समिती गणामध्ये अजनाळे, लिगाडेवाडी, कमलापूर, गोडसेवाडी, चिणके, य.मंगेवाडी, वझरे या गावांचा समावेश आहे.

राजुरी पंचायत समिती गणामध्ये उदनवाडी, कारंडेवाडी, झापाचीवाडी, राजुरी, अनकढाळ, मानेगाव, हणमंतगाव, पाचेगाव खुर्द, मिसाळवाडी, नलवडेवाडी, निजामपूर, लोणविरे या गावांचा समावेश आहे.

चोपडी पंचायत समिती गणामध्ये चोपडी, बंडगरवाडी, बलवडी, नाझरे, सरगरवाडी, सोमेवाडी, बुध्देहाळ, करांडेवाडी या गावांचा समावेश आहे.

कोळा पंचायत समिती गणामध्ये कोळा, कराडवाडी, कोंबडवाडी, किडबिसरी, पाचेगाव बु या गावांचा समावेश आहे.

हातीद पंचायत समिती गणामध्ये जुनोनी, काळूबाळूवाडी, हातीद, तिप्पेहळ्ळी, जुजारपूर, गुणापवाडी, ह.मंगेवाडी, गौडवाडी या गावांचा समावेश आहे.

सोनंद पंचायत समिती गणामध्ये सोनंद, गळवेवाडी, डोंगरगाव, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी या गावांचा समावेश आहे.

घेरडी पंचायत समिती गणामध्ये घेरडी, हंगिरगे, गावडेवाडी, पारे, डिकसळ, नराळे, हबिसेवाडी या गावांचा समावेश आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon