सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा ‘ईद’ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

मुंबई : बॉलिवूड विश्वात सध्या विकी कौशलच्य छावा सिनेमाची चलती आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्र्यावर आधारीत हा सिनेमा असून संभाजीराजेंच्या शौर्य आणि बलिदानाचा इतिहास पहिल्यांदाच 70 मिमी पडद्यावर मांडण्यात आला आहे. प्रेक्षकांचाही या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून चित्रपटातील काही सीन अंगावर शहारे आणणारे आहेत. एकीकडे छावा सिनेमाची धूम सुरू असतानाचा  बॉलिवूडचा भाईजनान सलमान खानचा (Salman Khan) ‘सिकंदर’ (Sikandar) हा नवा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सिकंदर सिनेमाचा टिझर रिलीज झाला होता. त्यानंतर, आज चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित केलं आहे.

सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या सिकंदर सिनेमाचं पहिलं पोस्टर 26 डिसेंबर 2024 रोजी लाँच करण्यात आल होतं. त्यानंतर, सिकंदरचा टिझरही प्रदर्शित झाला होता. आता, या सिनेमाचं आणखी एक पोस्टर लाँच करण्यात आले असून पोस्टरमधील सलमानचे डोळेच सारं काही बोलून जात आहेत. यंदाच्या रमजान ईदला हा सिकंदरा हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे सलमानाने हे पोस्टर शेअर करताना म्हटलं आहे. साजिद नाडियाडवालाने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून सिकंदर सिनेमाचे निर्माता AR. Murugadoss आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाताही रश्मिका मंदाना झळणार आहे. कारण, आपल्या ट्विटमध्ये त्याने रश्मिकाला देखील टॅग केले आहे. 14 सेकंदाच्या व्हिडिओतून हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

सिकंदर सिनेमात सलमानसोबत रश्मिका मंदाना आणि काजल अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मार्च म्हणजेच पुढील महिन्यात ईच्या मुहूर्तावर सिकंदर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी चित्रपटगृहात धडक देणार आहे. यापूर्वी सलमानचा लाँच झालेला टिझर पाहूनही चाहत्यांची उत्कंठा वाढली होती. त्यामुळे, आजच भाईजानचे नवे पोस्टर पाहून आता सिनेमाची कथा आणि सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, पुष्पा सिनेमानंतर अनेकांची क्रश बनलेल्या रश्मिका मंदानाची छावा सिनेमाच्या माध्यमातून हिंदीत एन्ट्री झाली आहे. तर, पहिल्यांदाच सलमान खानसोबत ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon