Rule Changes From April: इन्कम टॅक्स, सिलेंडर, ATM ते टोल पर्यंत… आज पासून लागू होणार मोठे बदल

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Rule Changes From April: 1 एप्रिल 2025 पासून होणार ‘हे’ 10 महत्त्वाचे नियम, इनकम टॅक्स, सिलेंडर, ATM ते टोल पर्यंत…, जाणून घ्या काय महाग होणार आणि काय स्वस्त…

देशात 1 एप्रिल म्हणजे आज पासून आर्थिक वर्ष सुरु होता. 2025 – 2026 साठी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या बजेटवर मंगळवार पासून काम सुरु होणार आहे. सादर झालेल्या बजेटमध्ये सरकारने टॅक्स पेयर्स, स्टार्टअप कंपन्यांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या. आता त्यांच्यावर नवीन नियम लागू होणार आहे. LPG, ATM, UPI आणि GST मध्ये देखील बदल होणार आहेत. तर आज जाणून घेवू 1 एप्रिल पासून कोणते नवीन बदल लागू होणार आहेत.

 

टॅक्स स्लॅबमध्ये बदल

2025 – 2026 या आर्थिक वर्षासाठी टॅक्स स्लॅबमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनी टॅक्स भरावा लागणार नाही. 20 ते 24 लाख रुपयांच्या उत्पन्नासाठी 25% टॅक्सचा नवीन स्लॅब देखील नवीन कर प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे मध्यम आणि उच्च-मध्यम उत्पन्न गटांसाठी कर बचत होईल.

TDS मर्यादेत बदल

1 एप्रिल पासून कर दात्यांना TDS मध्ये देखील दिलासा मिळणार आहे. सरकारने TDS च्या मर्यादेत देखील वाढ केली आहे. यामुळे छोट्या करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भाड्याच्या उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा 2.4 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये करण्यात आली आहे. व्यावसायिक सेवांवरील TDS मर्यादा आता 30,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा 1 लाख रुपये करण्यात आली आहे.

TCS च्या मर्यादेत वाढ

TDS सोबतच सरकारने TCS च्या मर्यादेत देखील वाढ केले आहे. आता TCS च्या मर्यादेत 7 लाख रुपयांवरून 10 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच आता पालक आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवू शकणार आहेत. त्याच वेळी, जर पैसे कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज म्हणून घेतले गेले असतील, तर त्यावर टीसीएस आकारला जाणार नाही.

RuPay डेबिड कार्डमध्ये होणार बदल

कार्डधारकाला आता फिटनेस, प्रवास, मनोरंजन आणि वेलनेस सेवांमध्ये फायदे मिळतील. याअंतर्गत एक मोफत डोमेस्टिक लाउंज व्हिजिट, प्रत्येक तिमाहीत दोन आंतरराष्ट्रीय लाउंज भेटी आणि अपघात झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक अपघात कव्हर मिळणार आहे.

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींचा दर महिन्याच्या सुरुवातीला आढावा घेतला जातो. अशात 1 एप्रिलपासून तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करू शकतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडू शकतो.

युनिफाइड पेन्शन योजना

1 एप्रिल पासून युनिफाइड पेन्शन योजना लागू होणार आहे. ज्यामुळे 25 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. योजने अंतर्गत 25 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% पेन्शन म्हणून मिळेल.

GST मध्ये होणार बदल

1 एप्रिल पासून जीएसटीमध्ये देखील बदल होणार आहेत. या अंतर्गत इनपुट सर्व्हिस डिस्ट्रिब्युटर (ISD) प्रणाली लागू केली जाईल. या नियमाचा उद्देश राज्यांमध्ये कर महसुलाचे योग्य वितरण सुनिश्चित करणे हा आहे.

टोलच्या होणार वाढ

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (NHAI) ने 1 एप्रिलपासून टोल टॅक्सचे दर वाढणार आहे. लखनऊ, कानपूर आणि दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवे सारख्या प्रमुख मार्गांवर टोल वाढण्याची शक्यता आहे. हलक्या वाहनांसाठी ही वाढ 5 रुपयांपर्यंत, तर जड वाहनांसाठी 20 ते 25 रुपयांपर्यंत टोल असू शकते.

बचत खात्यामध्ये रक्कम

1 एप्रिलपासून, तुम्हाला तुमच्या बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक असेल. तसं न केल्यास दंड होऊ शकतो. वेगवेगळ्या बँकांची किमान शिल्लक मर्यादा वेगळी असू शकते.

UPI नियमांमध्ये बदल

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) 1 एप्रिल 2025 पासून अशा मोबाईल बँकांचे UPI व्यवहार बंद करणार आहे, जे बर्याच काळापासून निष्क्रिय आहेत. म्हणजेच तुमच्या बँक खात्याशी कोणताही जुना क्रमांक जोडलेला असेल तर तो लगेच अपडेट करा.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon