मुंबई:
कांदिवली व मालाड परिसरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या आणि धोकादायक अवस्थेत पोहोचलेल्या सात पुलांच्या पुनर्बांधणीला अखेर गती मिळाली असून, याचे संपूर्ण श्रेय रिपब्लिकन पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष शिवराज कोंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जाते.
महत्वाचे म्हणजे, या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेने ₹26.43 कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. यात तीन वाहन पूल आणि चार पादचारी पूल (FOBs) यांचा समावेश असून, पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
शिवराज कोंडे यांनी सातत्याने घेतला पुढाकार
स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे काम तातडीने व्हावे म्हणून शिवराज कोंडे यांनी महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, बैठका घेतल्या आणि ठोस निर्णयासाठी दबाव आणला त्यासाठी जनआंदोलन करण्याचे ही सांगितले होते. त्यांच्या चिकाटीला अखेर यश मिळाले आणि आज हे महत्त्वाचे काम सुरू झाले आहे.
या कामासाठी तिघांनी निविदा (tender) दाखल केल्या होत्या. सर्वात कमी दर M/s. Bucon Engineers and Infrastructure Pvt. Ltd. यांनी दिला, जो मूळ अंदाजित खर्चापेक्षा ११% अधिक (₹21.82 कोटी) होता. त्यानंतर झालेल्या प्रक्रियेत महापालिकेने ₹26.43 कोटींच्या करारावर शिक्कामोर्तब केले
यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे, तसेच वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. कामाच्या कालावधीत वाहतूक व्यवस्थापनासाठी वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने विशेष योजना आखण्यात येत आहे.
पुलांचे तपशील:
पादचारी पूल (FOBs):
महालक्ष्मी (अनमोल) डेअरी फार्म : 18.80 मी × 3 मी
हनुमान नगर : 18.80 मी × 3 मी
गावदेवी रोड : 12 मी × 9.5 मी
नरवणे ट्रान्झिट कॅम्प : 13.76 मी × 3 मी
रामनगर चाळ, बिहारी टेकडी : 30.02 मी × 3 मी
वाहन पूल:
सुरभी कॉम्प्लेक्ससमोर : 9 मी × 16.40 मी
अप्पा पाडा, गांधी टेकडी : 13.6 मी × 21.3 मी
शिवराज कोंडे यांच्या प्रयत्नांमुळेच आज ही कामे प्रत्यक्ष सुरू झाली असून,याबदल प्रभागातील नागरिक शिवराज कोंडे यांचे अभिनंदन करत आहेत.