टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

तुमचे बंद रेशन कार्ड ‘या’ App वरून पुन्हा सुरू करा, E-KYC ची ऑनलाईन प्रोसेसही जाणून घ्या

How to reactivate a closed Ration Card: मध्य-पूर्वेतील इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाई आहे. या पाश्वभूमीवर कधीही रेशन दुकानात पुन्हा रॉकेल (केरोसिन) विक्री सुरू होऊ शकते. दरम्यान, तुमचे रेशन कार्ड बंद पडले असेल किंवा KYC झालेली नसेल तर अडचणी येऊ शकतात. अशा वेळी रेशन कार्ड अपडेट करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.

Ration Card। Maharashtra Times

How to reactivate a closed Ration Card :
मध्य-पूर्वेतील इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे भारताच्या अनेक राज्यात गॅस सिलिंडर, पेट्रोलच्या टंचाईचा सामना करावा लागत आहेत. अशा संकटात रॉकेल (केरोसिन) पुन्हा रेशन दुकानात वितरित केले जाण्याची देखील शक्यता आहे. पण, KYC न केल्यामुळे किंवा बऱ्याच काळ धान्य न घेतल्यामुळे रेशन कार्ड ‘सस्पेंड’ किंवा बंद होते. आता अशा कार्डधारकांसाठी ‘UMANG’ (Unified Mobile Application for New-age Governance) हे ॲप महत्त्वाचे ठरत आहे. यावरुन तुम्ही तुमचे रेशन कार्ड अपडेट करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया.

UMANG ॲप कसे फायदेशीर ठरेल?

उमंग हे केंद्र सरकारचे अधिकृत ॲप आहे, ज्यावर एकाच ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेकडो सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ‘Mera Ration’ आणि ‘PDS’ (Public Distribution System) शी संबंधित सर्व सेवांचा समावेश आहे.

बंद रेशन कार्ड सुरू करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

  • तुमचे रेशन कार्ड बंद झाले असल्यास, ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
  • ॲप डाउनलोड आणि नोंदणी: सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून UMANG ॲप डाउनलोड करा. तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यावर नोंदणी करा आणि MPIN सेट करा.
  • ‘Mera Ration’ सेवा शोधा: ॲपमध्ये वरच्या बाजूला असलेल्या सर्च बारमध्ये ‘Mera Ration’ किंवा ‘PDS’ टाईप करा.
  • राज्य निवडा: तुम्ही ज्या राज्यातील रहिवासी आहात, त्या राज्याचा विभाग निवडा (उदा. महाराष्ट्र).
  • रेशन कार्ड डिटेल्स तपासा: ‘View Ration Card Details’ वर क्लिक करून तुमचा रेशन कार्ड नंबर टाका. येथे तुम्हाला तुमचे कार्ड Active आहे की नाही, हे समजेल.
  • e-KYC पूर्ण करा: रेशन कार्ड बंद होण्याचे मुख्य कारण ‘केवायसी’ नसणे हे असते. ॲपमध्ये असलेल्या ‘Update Member Details’ किंवा ‘E-KYC’ पर्यायावर जाऊन आधार कार्ड लिंक करा. सदस्यांची माहिती अपडेट केल्यानंतर तुमचे कार्ड पुन्हा सक्रिय होण्याची प्रक्रिया सुरू होते.

UMANG ॲपद्वारे E-KYC करण्याची पद्धत

  • स्टेप 1: तुमच्या मोबाईलमध्ये UMANG App ओपन करा (नसल्यास प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा).
  • स्टेप 2: ॲपमध्ये लॉग-इन करा आणि सर्च बारमध्ये ‘Mera Ration’ किंवा ‘Department of Food and Public Distribution’ असे टाईप करा.
  • स्टेप 3: तुमच्या राज्याचे नाव निवडा (उदा. महाराष्ट्र).
  • स्टेप 4: तिथे ‘View Ration Card Details’ किंवा ‘E-KYC’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • स्टेप 5: तुमचा रेशन कार्ड नंबर प्रविष्ट करा.
  • स्टेप 6: कार्डमधील ज्या सदस्याचे ई-केवायसी करायचे आहे, त्याचे नाव निवडा आणि त्याचा आधार नंबर टाका.
  • स्टेप 7: आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो प्रविष्ट करा.
  • स्टेप 8: ‘Submit’ वर क्लिक करा. तुमचे E-KYC यशस्वी झाल्याचा मेसेज तुम्हाला मिळेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now