Raj Thackeray & Uddhav Thackeray Morcha: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची इनसाईड स्टोरी, मातोश्री-शिवतीर्थवर काय आणि कसं घडलं?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्यादृष्टीने पहिलं पाऊल पडलं आहे. फडणवीसांच्या भेटीनंतर ही चर्चा थांबली होती. मात्र, आता ठाकरे बंधू एकत्र येणार

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्याविरोधात 5 जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. यानंतर संजय राऊत यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकत्र येण्याची संपूर्ण कहाणी प्रसारमाध्यमांना सांगितली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता परस्परांची भूमिका मान्य केल्याचे राऊतांनी सांगितले.

काल राज ठाकरेंना सरकारमधील काही लोक भेटायला आले होते. त्यावेळी मातोश्रीवर मराठी कृती भाषा समितीचे लोक उद्धव ठाकरेंना भेटायला आले होते. राज ठाकरे यांनी 6 जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यावेळी आम्ही मातोश्रीवर बैठकीत होतो, आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हते. मातोश्रीवरील बैठक आटोपून बाहेर पडल्यानंतर मला राज ठाकरेंचा फोन आला. त्यांनी म्हटले की, तुम्ही 7 तारखेला आंदोलन ठरवलं, मी आताच 6 तारखेची घोषणा केली. मराठी भाषेचे दोन वेगळे मोर्चे निघणं बर दिसत नाही, हे एकत्र आंदोलन झालं तर जास्त प्रभाव पडेल. मराठी भाषिकांना आनंद होईल. त्यावर मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करतो. त्यानंतर पुन्हा मातोश्रीवर गेलो आणि उद्धव ठाकरेंना हे सगळं सांगितलं. त्यांनी म्हटलं की, मी मनसेप्रमुखांनी बोललो फोनवर. त्यावर कोणतेही आढेवेढे न घेता उद्धव ठाकरे म्हणाल की, मराठी माणसाचं ऐक्य दिसणं गरजेचं आहे. 7 तारखेची आषाढी एकादशी असल्याने उत्सव असल्याने आपलं आंदोलनं मराठी माणसांपर्यंत पोहोचवणं अडचणीचं जाईल. त्यामुळे 7 तारखेला आपण आंदोलन ठरवले होते. आता एकत्र करणार असून तर अडचण नाही, आपण त्यांच्याशी चर्चा करु. 7 तारखेऐवजी मोर्चाची तारीख 5 जुलै करावी, असे उद्धव यांनी म्हटले. त्यानंतर मी पुन्हा राज ठाकरे यांना फोन करुन यासंदर्भात विनंती केली. मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख काय बोलले हे सांगितले. त्यांनीही तात्काळ होकार देत त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन मला परत फोन केला. आपण सगळेजण 5 जुलैला  एकत्रपणे मोर्चात सहभागी होऊ, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon