टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Vidhanparishad Election 2026 Shivsena: मोठी बातमी: विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला, दुसऱ्या जागेवर धक्कातंत्राचा वापर करणार? ही 6 नावं रेसमध्ये

On: April 18, 2026 10:05 AM
Follow Us:

Vidhanparishad Election 2026: एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना नारळ देणार. विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच शिवसेना शिंदे गटात हालचालींना वेग

Vidhanparishad Election 2026: राज्यसभा निवडणुकीत ऐनवेळी ज्येष्ठ नेत्यांना डावलून सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानपरिषद निवडणुकीतही (Vidhanparishad Election 2026) धक्कातंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर शिंदे गटाच्या अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ देऊन त्याठिकाणी नव्या चेहऱ्यांची निवड एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून केली जाऊ शकते. विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच सध्या शिवसेना शिंदे गटात हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Maharashtra Politics news)

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना विधानपरिषदेसाठी पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, विधानपरिषदेच्या दुसऱ्या जागेसाठी पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या कोट्यातली दुसऱ्या जागेवरुन उमेदवारी मिळावी, यासाठी रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दिपक सावंत आणि इतर अनेक नेते इच्छूक आहेत.

विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ हे 57 असून विधान परिषदेची दुसरी जागा निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र, राज्यसभेप्रमाणे शिंदे आता विधान परिषदेच्या दुसऱ्या जागेसाठी पक्षातील अनुभवी नेत्यांची निवड करतात की, ज्योती वाघमारे प्रमाणे सामान्य शिवसैनिकाला संधी देतात का, हे पाहणं महत्वाचे आहे. याशिवाय, एकनाथ शिंदे लवकरच पक्षात भाकरी फिरवतील, अशीही जोरदार चर्चा आहे. त्यानुसार एकनाथ शिंदेंकडून अकार्यक्षम मंत्र्यांच्या हाती नारळ देऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी काही मंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या मंत्र्यांकडे काम घेऊन गेल्यावर ते काम करत नाहीत, असा नाराजीचा सूर शिवसेना आमदारांनी लावला होता. अलीकडेच धाराशिव आणि सोलापूरमध्ये शिवसैनिकांच्या नाराजीचा उद्रेक पाहायला मिळाला होता. त्यामुळे आता एकनाथ शिंदे कोणत्या मंत्र्याला कॅबिनेटमधून डच्चू देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now