राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये, एकमेकांना सोबत घेऊन काम करा असा मंत्र दिला. तसेच योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Raj Thackeray: वीस वर्षांनी जर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? कोणत्याही प्रकारचा वाद न ठेवता निवडणुकीच्या तयारीला लागा असा ‘मनसे’ कानमंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये दिला. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये, एकमेकांना सोबत घेऊन काम करा असा मंत्र दिला. तसेच योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मतदारयादीवर विशेष काम करा आणि मतदार याद्या तपासा
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीमध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मतदार यादीवरूनही भाष्य केले. ते म्हणाले की मतदारयादी तपासून घ्या. जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने सोबत घ्या. मतदारयादीवर विशेष काम करा आणि मतदार याद्या तपासा अशी सूचनाही राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचा आदेशही राज ठाकरे यांनी दिला. दरम्यान मेळावा पार पडल्यानंतर मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की राज ठाकरे यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पूर्वीच पोहोचल्या आहेत. जर आम्ही दोघे भाऊ 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर येऊ शकतो, तर तुमच्यात वाद ठेवू नका एकोप्यानं काम करा, असा सल्ला राज यांनी दिला असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार
राज ठाकरे यांनी मेळाव्याला संबोधित करताना सांगितले की, आपला पक्ष मुंबईत सर्वात जास्त बलवान आहे. यावेळी मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार असून हे टाळ्या शिकण्यासाठी मी बोलत नाही. जुने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या, जे पक्षापासून दूर गेले आहेत त्यांना सुद्धा एकत्र करून तयारीला लागा, असे ते म्हणाले. दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले की, विनाकारण कोणालाही मारू नका आधी समजवून सांगा. मराठी शिकायला बोलायला तयार असेल, तर शिकवा. उर्मट बोलत नसेल तर वाद घालू नका, पण उर्मट बोलला तर मग पुढे तशी भूमिका घ्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच या घटेनाचा व्हिडिओ काढू नका, असाही पुनरुच्चार त्यांनी केला.
संबंधित बातम्या




