टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महाराष्ट्रात आजही वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी दक्षतेचा इशारा

On: May 7, 2025 11:03 AM
Follow Us:

Maharashtra Weather News Today:  महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather News Today: महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा फटका बसला. पावसामुळं अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, उर्वरित राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने आजसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दक्षिण तेलंगण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून रायलसीमा, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळं राज्यात ढगाळ आकाश होत असून मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस, गारपिटीने हजेरी लावली होती. ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामनामुळं तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे.

आत जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड येथे जोरदार वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदूरबार, येथे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रात्रीनंतर आता सकाळी पुन्हा दमदार हजेरी लागली . वादळी वाऱ्यामुळे पालघरच्या ग्रामीण भागातील अनेक घरांच नुकसान झाले आहे . तर भात शेती आणि वीट उत्पादक व्यावसायिकांना देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे . जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झालाय, तर पूर्व भागात पावसाची रिपरिप सुरू आहे.

कल्याणमध्येही जोरदार पाऊस

काल रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आज पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी लावल्याने गारवा निर्माण झालेली आहे.काल अचानक आलेल्या पावसामुले कल्याण पूर्वे मध्ये झाड पडून तीन जणांचा मृत्यू झाला होता आज सकाळ पासून ढगाळ वातावरण होता काही वेळापासून कल्याण मध्ये जोरदार पाऊस सुरु झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

MPSC Group C Extension : एमपीएससीच्या ‘गट-क’ पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर

अजून 7 खासदारांचा हवा पाठिंबा, सरकारने बाहेर काढला हुकमी एक्का, बहुमताचा कसा होणार जुगाड?

Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले…

FASTag वापरताय? बॅलन्स कमी असल्यास टोल नाक्यावर भरावा लागेल दुप्पट टोल; प्रवासाला निघण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या

Latur DCC Bank Election Result 2026: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर; देशमुखांच्या सहकार पॅनला स्पष्ट बहुमत, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Pandharpur Ambegaon Well Collapse: विहिरीच्या मोजमापासाठी उतरले, अचानक ढिगारा कोसळल्याने अडकले; 24 तासांनी 4 मजूरांचे मृतदेह सापडले, पंढरपुरातील आंबेगावातील सुन्न करणारी घटना