Rain Alert 25 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टीच्या क्रियाकलापांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, जी 2 किंवा 3 मार्चपर्यंत सुरू राहू शकते. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात काही ठिकाणी बर्फवृष्टी तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम उत्तर पाकिस्तान आणि आजूबाजूच्या भागावर झाला आहे. त्यामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामानात काही बदल दिसून येतील. फेब्रुवारी महिन्यात पावसाची कमतरता होती. मात्र येत्याकाळात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्कायमेट या एजन्सीच्या अंदाजानुसार, अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, जम्मू-काश्मीर आणि उत्तर-पश्चिम राजस्थानच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
25 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टीच्या क्रियाकलापांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, जी 2 किंवा 3 मार्चपर्यंत सुरू राहू शकते. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात काही ठिकाणी चांगलीच बर्फवृष्टी होऊ शकते तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी उत्तर राजस्थानमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर आज किमान तापमान 12 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस असू शकते. यानंतर उद्यापासून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमानात घट होईल.
राज्यात उकाडा वाढणार
तर महाराष्ट्रात सध्या तापमानाचा पारा भयानक वाढलाय. फेब्रुवारी महिन्यातच सूर्य तळपू लागलाय. राज्यभरात तीव्र तापमानाचे अलर्ट देण्यात आले असून कमाल तापमानाचा पारा 35-38 अंशांपर्यंत राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उष्णतेची धग आता चांगलीच जाणवू लागलीय. मुंबईत सोमवारी सांताक्रूझ भागात दुपारी कमाल तापमान 38.40 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात मुंबईसह कोकणपट्ट्यात सध्या प्रचंड उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या नोंदी होत असून नागरिकांना प्रचंड उकाडा आणि उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागू शकतं.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार