टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

पुणेकरांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी घेतला पंगा, हॉटेलमध्ये लावली अशी पाटी, वाचून व्हाल वेडे

LPG Price Hike India: इराण विरूद्ध इस्राईल युद्धामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान पुण्यातील एका हॉटेल मालकाने या परिस्थितीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलं. त्याच्या नावानं एक पाटी सुद्धा लावली. या पाटीवरील मजकूर वाचून खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही.

Donald Trump
इस्राईल आणि अमेरिका विरुद्ध इराण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य आशियात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याचा परिणाम आता हळूहळू इतर देशांवरही दिसू लागला आहे. भारतामध्ये सुद्धा पेट्रोल आणि गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. LPG गॅस सिलिंडर १५-१५ दिवस उशिराने मिळत आहेत. त्यामुळे हॉटेल उद्योगाला मोठा फटका बसला आहे. या आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी काही हॉटेल्स गॅस सिलिंडरच्या नावाने अतिरिक्त पैसे आकारत आहेत. याच पार्श्वभूमीवर एक पुणेरी पाटी सध्या व्हायरल होत आहे. या हॉटेलच्या मालकाने अगदी पुणेरी शैलीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टोला लगावला आहे. ही पाटी जर खरंच ट्रम्प यांनी वाचली, तर ते काय उत्तर देतील? पाटी वाचा आणि उत्तर द्या.

काय लिहिलं आहे या पाटीवर?

काय लिहिलं आहे या पाटीवर?

ही पाटी पुण्यातील एका हॉटेलच्या दरवाज्यावर लावण्यात आली आहे. त्यामध्ये लिहिलं आहे, “नारंगी केसांच्या माणसामुळे सुरू झालेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे एलपीजी गॅस आणि प्लास्टिक कंटेनरचे दरही वाढले आहेत. म्हणून २१ मार्चपासून नवीन दर लागू करण्यात येत आहेत. कृपया सहकार्य करा, नाहीतर युद्ध थांबवा.” पदार्थांचे दर वाढले आहेत, पण त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलं जात आहे. ही पुणेरी पाटी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे आणि त्यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

नेटकरी घेत आहेत फिरकी

ही पोस्ट @SMahashur या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. आतापर्यंत ही पाटी २ लाख ४७ हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय, “हे युद्ध आता फक्त पुणेकरच थांबवू शकतात,” तर कोणाला प्रश्न पडलाय, “युद्ध थांबवायचं कसं?” असो, तुम्हाला हा पुणेरी टोला कसा वाटला? तुम्हीही आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

महाराष्ट्र बातम्या

5 नवीन स्मार्टफोन्स लॉन्च होणार, OnePlus 15T पासून Galaxy A57 पर्यंत, यादीच वाचा

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

PM Kisan Yojana: तर या शेतकर्‍यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता… काय आहे अपडेट?

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! गौण खनिजावरील रॉयल्टी माफ, शेती करा सुपीक, अर्ज करावा कसा?

पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही दुसरं लग्न केलं आता…, फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

शिवसेनेची ताकद वाढली; सचिन अहिर यांच्यानंतर आणखी एक आमदार फुटला, शिंदे म्हणाले….

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत नाव हुडकायचं कसं? जाणून घ्या एका क्लिकवर, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया.. पुन्हा महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ?