टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Pune Crime News: लोणावळ्यात दरोडा, 20-22 जण टेम्पोतून आले, तलवारी नाचवत 11 लाख लुटून नेले, सिनेस्टाईल रॉबरीन खळबळ

Lonawala Robbery: लोणावळ्यात घरफोडी करणाऱ्या दरोडेखोरांचा धुमाकूळ घातल्याचं दिसून येत आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या लोणावळा शहर पोलीस स्टेशन समोर घरावर दरोडा पडला, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

लोणावळा: लोणावळा शहरातील भर वस्तीतील एका बंगल्यावर 20 ते 22 दरोडेखोरांनी दरोडा टाकला, लोणावळा शहर पोलीस स्टेशन (Lonawala City Police) हाकेच्या अंतरावर असूनही पोलीसांना या दरोड्याची खबर नाही, लोणावळ्यातील डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या ओम बंगल्यावर 27 मे ला मध्यरात्री 3 च्या सुमारास वीस ते बावीस दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या दरोड्यात साडे अकरा लाखांची लूट करून दरोडेखोर पसार झाले. हे सर्व लुटारू एका छोट्या टेम्पोत तयारीने आले होते, मात्र पळून जाताना टेम्पो बंगल्यात सोडून गेले, या टेम्पोत चोरांच्या चपला, कपडे आणि दारूच्या बाटल्या पडल्या असल्याचं समोर आलं आहे. (Lonawala Crime News)

पाच ते सहा दरवाजे फोडून घरात प्रवेश

या बंगल्याला सीसीटीव्हीचं सुरक्षा कवच असताना ही ते भेदून या चोरांनी, मुख्य लोखंडी ग्रील तोडून आतील पाच ते सहा दरवाजे फोडून घरात प्रवेश केला, आणि वॉचमन आणि त्याच्या पत्नीला दोरखंडाने मजबूत बांधून, डॉ. खंडेलवाल दांपत्याला तलवारीचा धाक दाखवून घराची लूट केली. डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर पडलेला हा चौथा दरोडा असून त्यामुळे लोणावळ्यातील नागरिक आणि चिक्की व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे, या दरोड्याची कुणकुण लोणावळा पोलीसांना लागताच पोलीसांनी डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्याकडे धाव घेतली असता, पोलीसांची चाहूल लागताच दरोडेखोर पळाले, मात्र पुढे दरोडेखोर आणि मागे पोलीसांनी फिल्मी स्टाईलने दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र तो असफल होऊन दरोडेखोर चोरीची लूट घेऊन पोलिसांच्या देखत पसार झाले.

थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 

या पाठलागचा थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. परंतु या चोरीच्या घटनेने स्थानिक भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून या दरोड्यातील आरोपींना लवकरात लवकर पोलीसांनी अटक करावी, अन्यथा लोणावळा बंद करण्याचा इशारा श्रीधर पुजारी यांनी दिला आहे. तर दुसरीकडे लोणावळा पोलीसांची चार पथके या दरोडेखोरांच्या मागावर रवाना केल्याचं लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दांपत्याला तलवारीचा धाक दाखवून घराची लूट 

पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. मुख्य लोखंडी ग्रील तोडून आतील पाच ते सहा दरवाजे फोडून घरात प्रवेश केला, आणि वॉचमेन आणि त्याच्या पत्नीला दोरखंडाने मजबूत बांधून, डॉ. खंडेलवाल दांपत्याला तलवारीचा धाक दाखवून घराची लूट केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, या घटनेचा थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आणखी वाचा

विदर्भात पावसाचा कहर! वीज कोसळून चार जणांचा मृत्यू, तर 5 जण जखमी; पश्चिम विदर्भाची जीवन वाहिनी प्रवाहित

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती