टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Pune Accident News: पुण्यात दोन भीषण अपघात, अंगावरून टेम्पो गेल्यानं पत्नीचा मृत्यू; पती गंभीर जखमी, दुसऱ्या घटनेत ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू

Pune Accident News: तळेगाव आंबी येथे भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी झाला आहे.

पुणे :  पुण्यातील तळेगाव आंबी परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असून आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा (Pune Accident News) जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो त्यांच्या अंगावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. जखमी पतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.(Pune Accident News)

या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मार्गावर वारंवार अपघात होत असल्याची बाबही समोर आली असून वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी आंबी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला टेम्पो चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो त्यांच्या अंगावरून गेल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(Pune Accident News)

Pune Accident News: वडगाव मावळमध्ये चालकाला होरपळून मृत्यू 

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव मावळ येथे उड्डाणपुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव चारचाकी वाहनाला अचानक आग लागून वाहनातील चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रात्री साधारण दीडच्या सुमारास घडली. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस आणि वडगाव मावळ अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. चालकाला वेळेत बाहेर पडता न आल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. हा अपघात मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर घडला असून, घटनेचा पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.

Pune Accident News:  भोरमध्ये एसटीच्या धडकेत कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील भोर येथील रामबाग रस्त्यावर एसटी बस आणि इको कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या अपघाताबाबत भोर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

हेदेखील वाचा

मोदी-शहांचा करिष्मा! लोकांच्या घरची धुणीभांडी करणाऱ्या महिलेला भाजपने बनवलं आमदार

Horoscope Today 5th May 2026 : आजचा दिवस बदलू शकतो तुमचं नशीब.. वाचा मेष ते मीनचं राशी भविष्य !

वजन कमी करायचं आहे? सूर्योदयापूर्वी उठून करा हे काम

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Raj Thackrey : मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुकांच्या पलीकडे जाऊन… राज ठाकरे यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आवाहन काय? पोस्ट चर्चेत

IMD Monsoon Update : गुड न्यूज! आता वेटिंग नाहीच, अलर्ट आलाच… कधीही दणादण कोसळणार, मान्सूनची मोठी अपडेट लगेच करा चेक

Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos

MLC Election : मतदान होण्याआधीच ठाण्यात महायुतीचा गुलाल, एकनाथ शिंदेंचा मोठा विजय

प्रतिक्षा संपली, अखेर मॉन्सून केरळमध्ये दाखल, पावसाचा मोठा इशारा..

Delhi Malviya Nagar Fire : हॉटेलमध्ये आगीचा प्रचंड लोट, आक्रोश अन् किंचाळ्यांचे आवाज, अनेकांनी तिसऱ्या मजल्यावरून…; दिल्लीतील अग्नितांडवबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितला हादरवणारा घटनाक्रम