टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

तेरावा झाल्यानंतरच राजकीय चर्चा, रोहित पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष अन् व्हायरल व्हिडिओबाबत मांडली भूमिका

Follow Us:

तेरावा ज्या दिवशी होईल, त्या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन सांगेल, आता राजकीय बोलणे ते योग्य नाही. दादांसोबत काय चर्चा झाली, सगळ्या प्रक्रियेत मी होतो, मात्र तेरा दिवसांनी सांगेल.

नाशिक : अजित दादांची (Ajit pawar) बातमी आपण ऐकली, बातमी खरी आहे का स्वप्न आहे हे आम्हालाही कळत नाही. आजपर्यंत आम्ही त्या दु:खात आहोत, त्या विमानात आणखी जे होते त्यांचाही परिवार दुःखात होता. काही दिवसांपूर्वी कळले की, दिंडोरी तालुक्यातील सुदाम बोडके हे अजित दादांचे आणि साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. जेव्हा त्यांना अजित दादांच्या निधनाची बातमी कळली, तेव्हा अस्वस्थ झाले नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. आज पवार परिवार आणि हा परिवार दुःखात आहे. त्यामुळे, मी बोडके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले. तसेच, 9 तारखेपर्यंत मी कुठलीही राजकीय चर्चा करणार नाही. अजित दादांच्या तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मी राजकीय विषयावर भाष्य करेन, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

तेरावा ज्या दिवशी होईल, त्या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन सांगेल, आता राजकीय बोलणे ते योग्य नाही. दादांसोबत काय चर्चा झाली, सगळ्या प्रक्रियेत मी होतो, मात्र तेरा दिवसांनी सांगेल, असे म्हणत रोहित पवारांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओ अजित दादांसोबत काय चर्चा झाली, याबाबतचे बोलणे सध्यातरी टाळले. तसचे, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यावरही रोहित पवारांनी परखडपणे भूमिका मांडली.

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेताना पक्षाचे सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल होते. या नेत्यांची सुनेत्रा काकी यांच्याशी चर्चा झाली असेल, राजकारणात अनुभव कमी असला तरी त्या अनेक वर्षांपासून समाजकारणात काम करतात, असे रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, शपथविधी होणार असल्याचे आम्हाला कोणालाही माहित नव्हते, लाखो लोक बारामतीमध्ये पवार कुटुंबाला भेटण्यासाठी येत होते. पार्थ देखील होता, संपूर्ण महाराष्ट्र येऊन भेटत नाही, सांत्वन करत नाही तोपर्यंत आपण बारामतीत थांबले पाहिजे. आम्हाला शपथविधीची बातमी देखील टीव्हीच्या माध्यमातून कळाली, असे म्हणत कुटुंबीयांना शपथविधी सोहळ्याची माहिती नव्हती, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंचं ट्विट बघितलं नाही

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटसंदर्भात रोहित पवार यांनी बोलणे टाळले. मी ते ट्विट बघिले नाही, राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत तसे दिसत नाही. मात्र, पियुष गोयल यांच्या ट्विटबद्दल मी तेरावा झाल्यानंतरच बोलेल, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now