टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

PM Kisan Yojana: तर या शेतकर्‍यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता… काय आहे अपडेट?

PM Kisan Yojana 24th Installment: पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला. तर काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही. त्यांना पुढील 24 वा हप्ता सुद्धा मिळण्याची शक्यता कमी आहे. बोगस लाभार्थ्यांना चाप बसण्यासाठी नियम कडक करण्यात आले आहेत. ही नोंदणी आवश्यक आहे.

PM Kisan Yojana: तर या शेतकर्‍यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता... काय आहे अपडेट?

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. देशातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील हुगळी (तारकेश्वर) येथे आयोजित किसान सन्मान समारोह संमेलनातून एक कळ दाबून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण (DBT) पद्धतीने ही रक्कम जमा केली. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 31 कोटी 44 लाख रुपये जमा झाले. काही लाभार्थ्यांना मात्र हा हप्ता मिळाला नाही. त्यांच्या बँक खात्यात शेतकरी सन्मान निधीचा 24 वा हप्ताही जमा होण्याची शक्यता कमीच आहे. काय आहे त्यामागील कारण?

तीन हप्त्यात 6,000 रुपयांची मदत

पीएम किसान योजनेत दरवर्षी तीन हप्त्यात 6,000 रुपयांची मदत करण्यात येते. प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपयांचा असतो. जवळपास 4 महिन्यांच्या अंतराने ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेत बोगस लाभार्थी घुसू नये यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना वारंवार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगते. ही अट जर पूर्ण केली नाही तर मग लाभार्थी शेतकऱ्याचा हप्ताही थांबतो. ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही.

24 वा हप्ता कधी मिळणार?

PM Kisan Yojana चे आतापर्यंत 23 हप्ते जमा करण्यात आले आहेत. 20 जून 2026 रोजी हा हप्ता जमा करण्यात आला. आता पुढील हप्ता हा 4 महिन्यांनी हा हप्ता देण्यात येईल. या अंदाजाने ऑक्टोबर 2026 अथवा नोव्हेंबर 2026 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 24 वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. त्याअगोदर शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सातबारा उतारा, आधार कार्ड लिंक अशी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. ही एक महत्त्वाची डिजिटल प्रणाली आहे. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो. शेतीसंबंधीत योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ मिळण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही नोंदणी करणे आणि फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक

आधार कार्ड, तुमच्या मोबाईल क्रमाकांशी संलग्नित

जमिनीचा 7/12 उतारा, 8-अ

बँक पासबुक गरजेचे

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! गौण खनिजावरील रॉयल्टी माफ, शेती करा सुपीक, अर्ज करावा कसा?

पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही दुसरं लग्न केलं आता…, फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

शिवसेनेची ताकद वाढली; सचिन अहिर यांच्यानंतर आणखी एक आमदार फुटला, शिंदे म्हणाले….

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत नाव हुडकायचं कसं? जाणून घ्या एका क्लिकवर, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया.. पुन्हा महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ?

Rain Update : महाराष्ट्रात या तारखेला पाऊस घालणार धुमाकूळ, थेट मुसळधार पावसाचा इशारा, जुलैच्या..