ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन ; स्व.गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख अडकले विवाह बंधनात

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला (प्रतिनिधी):- प्रत्येकाच्या आयुष्यातील काही मोजके समारंभ असतात की ज्याची आठवण राहावी म्हणून लोक लाखो रुपयांचा अक्षरशः चुराडा करतात. परंतु लग्नसमारंभाच्या सर्व पद्धतींना फाटा देत स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख व नव वधू डॉ. आस्था अनिकेत देशमुख यांचा मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला.

स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे नातू शेकाप युवा नेते डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांनी कोणताही डामडौल न करता डॉ. आस्था हणमंत लाकाळ-पाटील मु.पो. पळसप, ता. धाराशिव, जि. धाराशिव यांचे सोबत अतिशय साधेपणाने विवाह संपन्न केला. पुरोगामी विचाराचा वारसा असलेल्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत घराण्यातील डॉ. अनिकेत व डॉ. आस्था यांनी जातपात, धर्म न जुमानता माणूसपण जपत अतिशय साध्या पद्धतीने वैवाहिक जीवन सुरू केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

नवदामपत्य डॉ. अनिकेत व डॉ. आस्था अनिकेत देशमुख यांनी साध्या पद्धतीने विवाह केल्या नंतर आज्जी श्रीमती रतनाबाई गणपतराव देशमुख यांच्यासह कुटुंबातील वडिलधार्‍यांचे व कुलदैवताचे आशीर्वाद घेतले. तर आजोबा स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांच्या समाधी स्थळाला देखील भेट देऊन सपत्नीक दर्शन घेतले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon