टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा ‘तो’ भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील ‘या’ भागावर अतिवृष्टीचं संकट?

Nashik news: नाशिकवर ढगफुटीचं संकट ओढावलं, रात्री 11 वाजता गिरीश महाजन थेट मैदानात; रात्रीच्या काळोखात 100 हून अधिक नागरिकांचे स्थलांतर; नेमकं काय घडलं?

Nashik Heavy Rain Cloudburst vortex in Palghar causes intense train change direction to Ahilyanagar Akole Rain Marathi news Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?

Nashik Cloudburst Rain: हवामान खात्याने सोमवारी नाशिकमध्ये एका दिवसात 350 मिलीमीटर म्हणजे ढगफुटीसदृश पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. काल रात्रभर नाशिकमध्ये (Nashik news) मुसळधार पाऊस (Rain) कोसळला आहे. मंगळवारी सकाळी पावसाने नाशिक शहराच्या परिसरात विश्रांती घेतली असली तरी त्र्यंबकेश्वर, कसारा आणि इगतपुरी (Igatpuri) या परिसरात सध्या प्रचंड पाऊस पडत आहे. काल हवामान खात्याने पालघरमध्ये मोठ्याप्रमाणावर पावसाला कारणीभूत असणारा भोवरा (Vortex) मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, आता भोवरा वेगळ्याच दिशेने वळाल्याने नाशिकवरील अतिवृष्टीचे संकट टळण्याची शक्यता आहे. (Nashik Rain news)

काल पालघरमध्ये सुमारे 450 मिमी पाऊस पाडणारा आणि त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा (Vortex) आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले (अहिल्यानगर) परिसराकडे सरकल्याचे दिसत आहे. घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, एकूण परिस्थिती सध्या नियंत्रणात असून तुलनेने समाधानकारक राहिली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाचा बोगदा दुसऱ्या दिशेला सरकल्याने मंगळवारी नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी धोका काही प्रमाणात  कमी होणार आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या दिशेने वाहून येणारे ढग गुजरातच्या सुरत आणि अहिल्यानगरच्या अकोलेच्या दिशेने सरकत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तरीदेखील नाशिक, इगतपुरी त्रंबकेश्वर भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी कायम राहणार आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Nashik Dam: नाशिकमध्ये धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

* काल रात्रीपासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस; धरणांतील पाणीसाठ्यात वाढ
* नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 37% भरले
* दारणा धरणातील पाणीसाठा 21% वर
* भावली धरण 56% क्षमतेपर्यंत भरले
* जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 28% वर पोहोचला
* सततच्या पावसामुळे धरण क्षेत्रातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष

Satara Heavy Rain: साताऱ्यात पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस; कराड, पाटणसाठी 28 जवानांची एनडीआरएफ टीम दाखल

सातारा जिल्ह्याला तीन दिवसापासून रेड अलर्ट हवामान खात्याकडून दिला आहे. कराड आणि पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने 28 जवानांची एनडीआरएफ टीम दाखल झाली आहे. आपतकालीन परिस्थितीत तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आवाहन केले आहे.

Rain news: सुरगाण्यात मुसळधार पाऊस ; ‘ नार ‘ नदी दुथडी भरून वाहू लागली

हवामान खात्याच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.. या पावसामुळे ‘ नार ‘ नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील फरशी पुलावरूनही पाणी वाहत असल्याने वाहतुकीला खोळंबा झाला आहे. पुढील काही तास अतिवृष्टीसदृश पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

एअरटेलची कमाल! 548 च्या प्लॅनमध्ये 589 पेक्षा जास्त व्हॅलिडिटी, दोन्ही प्लॅनच्या किमतीत 41 रुपयांचा फरक

Farmer Loan Waiver: या बँकांकडून घेतलेले पीक कर्ज होणार माफ… या शेतकर्‍यांना फटका बसणार… मोठी अपडेट काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत! जयंत पाटील अन् विनोद तावडे यांची मुंबईत भेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवीन चाचपणी?

Eknath Shinde : दोन्ही हाताला सलाईनच्या पट्ट्या… एकनाथ शिंदे यांची रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग; तीन मंत्र्यांना दिले मोठे आदेश

PM Kisan Yojana: तर या शेतकर्‍यांना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता… काय आहे अपडेट?

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! गौण खनिजावरील रॉयल्टी माफ, शेती करा सुपीक, अर्ज करावा कसा?