टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

बडीशेप पासून बनवा उन्हाळ्याचा सुपर ड्रिंक, गॅस-ब्लोटिंगसारख्या 10 समस्यांपासून मिळेल त्वरित आराम

बडीशेप हा भारतीय घरांमध्ये सामान्यपणे वापरला जाणारा मसाला आहे. तर अनेक गुणधर्मांनी समृद्ध असलेली बडीशेप उन्हाळ्यात थंडावा देते. चला तर मग त्यापासून बनवलेल्या या सुपर ड्रिंकची रेसिपी आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात.

बडीशेप पासून बनवा उन्हाळ्याचा सुपर ड्रिंक, गॅस-ब्लोटिंगसारख्या 10 समस्यांपासून मिळेल त्वरित आराम

जेवणानंतर बडीशेप खाण्याची अनेकांना सवय असते. कारण बडीशेप खाल्ल्याने अन्नपदार्थांचे सहज पचन होते. पण हा केवळ एक विधी नाही तर पचनक्रिया चांगली ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात बडीशेप खाणे अधिक फायदेशीर मानले जाते, कारण बडीशेपच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. याचा आपल्या रोजच्या आहारात विशेषतः उन्हाळ्यात थोड्या प्रमाणात समावेश केला पाहिजे. या लेखात आपण बडीशेप आणि खडीसाखरेपासून बनवलेल्या पेयाबद्दल जाणून घेणार आहोत, जे केवळ चवीला चचविष्टच नाही, तर या ऋतूत सामान्यपणे आढळणाऱ्या अनेक समस्यांपासून आराम देखील देते.

पोषणतज्ञ यांनी या बडीशेपच्या पेयाची रेसिपी सांगितली आहे. या उन्हाळ्यात तुम्ही सुपर बडीशेप पेय बनवून त्याचे नियमित सेवन करू शकता जे केवळ एकाच नव्हे तर दहा आरोग्य समस्यांपासून आराम देण्यास प्रभावी आहे.

ड्रिंक प्रीमिक्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तुम्ही या पेयासाठी प्रीमिक्स तयार करून ठेऊ शकता जे गरजेनुसार फक्त 1 मिनिटात तयार होईल. प्रीमिक्स बनवण्यासाठी तुम्हाला 1 कप बडीशेप, 1 कप खडीसाखर आणि चवीसाठी 5-6 हिरव्या वेलची लागतील.

प्रीमिक्स बनवण्याची कृती

सर्वप्रथम बडीशेप मंद आचेवर हलकी भाजून घ्या आणि ती जळू नये म्हणून सतत परतवत राहा.

बडीशेप भाजून झाल्यावर ती एका ताटलीत काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.

बडीशेप थंड झाल्यावर त्यात खडीसाखर आणि हिरवी वेलची टाका. हे तिन्ही घटक बारीक पूड होईपर्यंत वाटा.

ही तयार केलेली पावडर एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून थंड आणि कोरड्या जागी ठेवा.

बडीशेपचे हे उन्हाळी पेय कसे बनवायचे?

हे पेय बनवण्यासाठी एका ग्लासात थंड किंवा सामान्य तापमानाचे पाणी घ्या. पाणी जास्त थंड घेऊ नका. आता या पाण्यात 1 किंवा 2 चमचे बडीशेपचे प्रीमिक्स पावडर मिक्स करा. चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या. इच्छित असल्यास चवीसाठी लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता.

तुमच्या शरीराला 10 पेक्षा जास्त फायदे मिळतील

हे पेय प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅसच्या त्रासापासून आराम मिळतो.

बडीशेपचे हे पेय उन्हाळ्यात होणाऱ्या आम्लपित्तापासून आणि पोटाच्या त्रासापासून आराम देते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पेय शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवून शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करेल.

बडीशेप आणि वेलची हे उत्तम ताजेपणा देणारे पदार्थ आहेत. हे पेय तुमचा श्वास फ्रेश करेल आणि तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करेल.

बडीशेप आणि खडीसाखरेचे हे पेय प्यायल्याने केवळ शरीराला पाणीच देत नाही, तर थंडावा देखील देते, त्यामुळे ते उष्माघातापासून बचाव होते.

या पेयात खडीसाखर असल्याने जी एक नैसर्गिक साखर असून शरीराला त्वरित ऊर्जा देते.

उन्हाळ्यात पोटात गॅस आणि जडपणाचा त्रास होत असला तरी हे पेय प्यायल्याने या त्रासापासून‍ त्वरित आराम मिळतो.

बडीशेप आणि खडीसाखरेचे हे पेय उन्हाळ्यात घशातील जळजळ आणि कोरडेपणा कमी करण्यास देखील उपयुक्त ठरते.

हे पेय पोटाला थंडावा देत असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे तोंडातील व्रण कमी करण्यासही उपयुक्त ठरते.

त्वचेच्या समस्यांवरही हे फायदेशीर मानले जाते.

खबरदारी

या पेयाचे अतिसेवन टाळा. बडीशेप पासून तयार पेयाचे दिवसातून एक ते दोन चमचे पुरेसे आहे. या पेयाचे जास्त सेवन केल्यास अतिसार आणि भूक न लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मधुमेह असल्यास हे पेय पिणे टाळा. कमी रक्तदाब असलेल्या लोकांनीही हे पिणे टाळावे. गर्भवती महिलांनी याचे सेवन प्रमाणात करावे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now